Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी

शुक्रवारी दुपारी १२ वाजता खडसंगी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेला सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे आता संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2026 | 03:14 PM
Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • ग्रामसभेच्या वेळी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी अनुपस्थित
  • खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
  • स्पष्टीकरणानंतरही ग्रामसभेच्या प्रत्यक्ष आयोजनाबाबतचा संभ्रम कायम
चिमूर: ग्रामसभेची नोटीस काढली, वेळ निश्चित केली आणि विषयपत्रिकेत महत्त्वाचे मुद्देही नमूद केले; मात्र प्रत्यक्ष ग्रामसभेच्या वेळी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी अनुपस्थित राहिल्याने खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेच्या आयोजनाबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असून, ग्रामसभा नेमकी कुणाच्या जबाबदारीने घ्यायची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार

शुक्रवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेत ‘रिफॉर्म उत्सव’, ‘पीपल्स प्लॅन कॅम्पेन’ (पीपीसी), विकसित भारत २०४७ तसेच महिला शेतकरी सक्षमीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला होता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

विशेषतः महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या उपाययोजना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील त्यांची भूमिका यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, सभेच्या आयोजनाबाबतच स्पष्टता नसल्याने विषयपत्रिकेतील मुद्द्यांवर प्रत्यक्ष चर्चा झाली का, ग्रामस्थांनी आपले प्रश्न मांडले का आणि त्यावर काही निर्णय घेण्यात आले का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतरही ग्रामसभेच्या प्रत्यक्ष आयोजनाबाबतचा संभ्रम कायम आहे. नोटीस काढण्यापासून ग्रामसभेचे कामकाज पार पाडण्यापर्यंतची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत ग्रामस्थांकडून स्पष्टता मागितली जात आहे.

आदेश वरिष्ठांचा, जबाबदारी कुणाची?

ग्रामपंचायत अधिकारी कवडू तराळे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभेची नोटीस वेळेवर काढण्यात आल्याचे सांगितले. आपल्याला केवळ नोटीस काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तर प्रत्यक्ष ग्रामसभा घेण्याची जबाबदारी सरपंचांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, सरपंच प्रियंका कोलते यांनी नोटीस वेळेवर काढण्यात आल्यामुळे त्यावर आपण स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले. तसेच प्रकृती अस्वस्थ असल्याने ग्रामसभेला उपस्थित राहता आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामसभा केवळ कागदोपत्री ?

गावाच्या विकासाचे निर्णय, नागरिकांच्या समस्या आणि शासनाच्या विविध योजनांबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. अशा परिस्थितीत विशेष ग्रामसभेची नोटीस काढूनही प्रत्यक्ष कामकाजाबाबत स्पष्टता नसेल, तर ग्रामस्थांच्या अपेक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विषयपत्रिकेत महिला शेतकरी सक्षमीकरणासारखा महत्त्वाचा मुद्दा असताना त्यावर प्रत्यक्ष चर्चा झाली का, याची अधिकृत माहिती ग्रामस्थांना मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार का आणि ग्रामसभेच्या आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

विशेष ग्रामसभेची नोटीस वेळेवर काढण्यात आल्यामुळे मी त्यावर सही केलेली नाही. त्यातच माझी तब्येतही बरी नसल्याने मला ग्रामसभेला उपस्थित राहता आले नाही.- प्रियंका कोलते, सरपंच, खडसंगी

Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी

वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभेची नोटीस वेळेत काढण्यात आली होती. आम्हाला केवळ ग्रामसभा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ग्रामसभा घेण्याची जबाबदारी सरपंचांची होती. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचे काम सरपंचानी करणे अपेक्षित होते. – कवडू तराळे, ग्रामपंचायत अधिकारी, खडसंगी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Khadsangi gram panchayat gram sabha confusion as sarpanch and officer remain absent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद
1

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद

Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार
2

Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार

Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी
3

Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती
4

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.