Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार

खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी परिसरातील जलप्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीकिनारी असलेल्या काही तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर मासेपालन सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2026 | 02:46 PM
Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार

Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार

Follow Us
Follow Us:
  • नदीकिनारी असलेल्या काही तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर मासेपालन सुरू असल्याच्या तक्रारींमुळे जलप्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • पाण्याची गुणवत्ता खालावत असून दुर्गंधी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे
  • तलाव आणि परिसरातील दुर्गंधी व संभाव्य प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
रसायनी: खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी परिसरात औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असतानाच नदीकिनारी असलेल्या काही तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर मासेपालन सुरू असल्याच्या तक्रारींमुळे जलप्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महड, धामणी, पौंध, कोपरी आणि चांभार्ली परिसरातील काही तलावांमध्ये मांगूर पालन केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी

माशांना मोठ्या प्रमाणात खाद्य टाकले जात असल्याने त्यातील शिल्लक खाद्य तलावाच्या पाण्यात कुजते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत असून दुर्गंधी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी ठराविक कालावधीनंतर नदीपात्रात सोडले जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे स्थानकांचे म्हणणे आहे.

तहसीलदार, मत्स्य विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्तपणे संबंधित तलावांची तातडीने पाहणी करून पाण्याचे नमुने घ्यावेत. तसेच तलाव आणि परिसरातील दुर्गंधी व संभाव्य प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रशासन प्रत्यक्ष पाहणी करून काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पाताळगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबरोबरच नदीकिनारी असलेल्या तलावांमधून होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाचीही तातडीने दखल घेण्यात यावी.

खालापूर, सावरोली पूल परिसरात दुर्गंधीचा त्रास

मांगूर माशांना खाद्य म्हणून कोंबड्यांचे टाकाऊ अवशेष वापरले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे खाद्य तलावात कुजल्याने दुर्गंधी वाढत असल्याची तक्रार आहे. तसेच मृत माशाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता काही ठिकाणी ते जाळले जात असल्याने महड गाव, देवस्थान परिसर, खालापूर तसेच सावरोली पूल परिसरात दुर्गंधीचा त्रास जाणवत असल्याचे नागरिक सांगतात.

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

परिसराची प्रशासनाने संयुक्त पाहणी करावी

पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर पाताळगंगा बचाव मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष राकेश खराडे यांचा शासन आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर नदीकिनारी असलेल्या तलावांमधील कथित मांगुर पालन, तलावातील पाणी नदीत सोडले जाते का, याची प्रशासनाने सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Khalapur patalganga river pollution alleged illegal catfish farming raises water contamination concerns hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी
1

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद
2

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद

Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी
3

Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती
4

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.