(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या सिझन ६मध्ये दररोज काही ना काही घडताना पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये राखीची एन्ट्री झाल्यापासून राखी काही ना काही करताना दिसते घरात. राखी नेहमी तिच्या स्टाइलने संपूर्ण गेम फिरवते आणि घरातील सदस्यांमध्ये भांडणं लावण्याचे काम करते. घरात जे स्पर्धक स्वत: चा गेम खेळत नाहीत, अशा सगळ्या सदस्यांना राखीने आरसा दाखवल्याचं पाहायला मिळाले आहे.
या आठवड्यात असंच काहीसं घडलं आहे. घरात नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर राखी आणि संकेत यांनी फेक भांडण करण्याचा प्लॅन केला होता. याची क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात का, हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये वारंवार चर्चेत येत असतो. बिग बॉस मराठीच्या अलीकडील भागात या चर्चेला थेट उत्तर मिळालं.
कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखने स्पष्टपणे सांगितलं की बिग बॉसचा गेम स्क्रिप्टेड नाही. रितेश म्हणाला, “हा बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड नाहीये. इथे स्क्रिप्टेड गोष्टी करू नका.” त्यांनी स्पष्ट केले की, संकेत आणि राखीमध्ये झालेल्या बोलण्यावरून प्रेक्षकांनी ज्या प्रकारे गोंधळ केला, तो फक्त स्पर्धकांची नैसर्गिक प्रतिक्रिया होती.
रितेशने सांगितले की, काही अॅक्टिंग करत राहणे, राग-राग करणे किंवा पाणी फेकण्याची कृती केलेली दिसली तरी, हा राखी सावंत शो नाहीये.
यानंतर राखीला तिची चूक उमगली आणि तिने पटकन उभी राहून कान पकडून रितेशची माफी मागितली. तरीही तिचा स्वभाव जसाचा तसा होता आणि ती पूर्णपणे ऐकली नाही. शेवटी रितेश म्हणाले, “एक मिनिट राखी…”, पण राखीने ऐकले नाही. प्रोमोमध्ये रितेश “I Am Done” म्हणत हात वर करतो आणि भाऊच्या धक्क्याला थांबवतो, असा क्षण प्रेक्षकांसमोर आला.
याच पार्श्वभूमीवर संकेत पाठक आणि राखी सावंत यांच्यात घडलेला एक प्रसंग सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.या प्रसंगाकडे काही प्रेक्षकांनी गैरसमज म्हणून पाहिलं, तर काहींना तो गेममधील एक रणनीतीपूर्ण क्षण वाटला. बिग बॉसच्या घरात नातेसंबंध, प्रतिक्रिया आणि परिस्थिती तपासत खेळ पुढे नेणं हीदेखील अनेकदा सदस्यांच्या गेम स्ट्रॅटेजीचा भाग असतो.
“माझ्यावर काळी जादू करण्यात आली…”, ‘CID’ मधून अचानक काढल्याबद्दल Jasveer Kaur ने दिले स्पष्टीकरण
दरम्यान, घरातील गटांच्या समीकरणांमध्येही बदल होताना दिसत आहेत. ‘टोळी’ आणि ‘काटा’ अशा गटांची चर्चा आधीपासूनच सुरू असताना, वाइल्ड कार्ड सदस्यांच्या आगमनानंतर आता घरात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेम जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे सदस्यांच्या रणनीती आणि नात्यांमधील बदल अधिक स्पष्ट होत आहेत. त्यामुळे संकेत-राखी यांच्यातील हा प्रसंग केवळ वाद होता की खेळातील एक स्मार्ट रणनीती, याबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहेत.






