Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल

Rucha Gaikwad Engagement:‘शेतकरीच नवरा हवा’ फेम अभिनेत्री ऋचा गायकवाडचा प्रथमेशसोबत साखरपुडा पार पडला. ‘When Konkan Meets Kolhapur’ थीम, ऋचाचा लूक आणि कलाकारांची उपस्थिती चर्चेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 08:42 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rucha Gaikwad Engagement: ‘शेतकरीच नवरा हवा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋचा गायकवाड सध्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ऋचाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातही एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऋचा गायकवाड हिचा प्रथमेशसोबत थाटात साखरपुडा पार पडला आहे. तिच्या साखरपुड्याचे व्हिडिओ फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘जेव्हा कोकण कोल्हापूरला भेटते’ अशी खास थीम

ऋचा गायकवाड आणि प्रथमेशच्या साखरपुड्यासाठी ‘When Konkan Meets Kolhapur’ अशी खास थीम ठेवण्यात आली होती. साखरपुड्याच्या सजावटीमध्ये कोकण आणि कोल्हापूरची खास झलक पाहायला मिळत आहे. पार्श्वभूमीवर कोकणातील निसर्गरम्य परिसरासोबत कोल्हापूरच्या प्रसिद्ध वास्तूची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या साखरपुडा सोहळ्याची थीमही विशेष आकर्षण ठरली आहे.

साखरपुड्यासाठी ऋचाने मॉडर्न आणि सुंदर लूक केला होता. तिच्या या खास लूकने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या साखरपुड्याच्या लूकचे काही जण कौतुक करत आहेत, तर काही नेटकऱ्यांनी तिच्या लूकवरून ट्रोलही केले आहे. त्यामुळे ऋचाचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, ऋचा आणि प्रथमेशच्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून, दोघांच्या नव्या आयुष्यासाठी चाहते त्यांना मनापासून शुभेच्छा देत आहेत.

Vibe Movie: चार जण, एक गूढ आणि मोठं संकट; ‘वाइब’चं नवं पोस्टर रिलीज, कुणाल खेमू-प्रीती झिंटाच्या लूकने वाढवली उत्सुकता

कलाकार मंडळींची खास उपस्थिती

ऋचा गायकवाड आणि प्रथमेशच्या साखरपुडा सोहळ्याला ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील कलाकारांनीही आवर्जून उपस्थिती लावली. अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरसह मालिकेतील अनेक कलाकारांनी ऋचाच्या या खास दिवसात सहभागी होत तिचा आनंद द्विगुणित केला. सहकलाकारांनी ऋचा आणि प्रथमेशला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या खास सोहळ्यातील कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असून, चाहत्यांचेही त्यावर भरभरून प्रेम मिळत आहे.

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाचं मुलांच्या सुरक्षित बालपणासाठी आवाहन; जालन्यात UNICEFच्या कार्यक्रमाला दिली भेट

Web Title: Rucha gaikwad prathamesh engagement photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Engagement
  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
1

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर
2

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
3

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
4

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.