Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये जलसमाधीचा थरार; सखुची अढळ भक्ती की विठुरायाचा चमत्कार?

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘सखा माझा पांडुरंग’ सध्या चर्चेत आली आहे. या मालिकेमध्ये नवा अध्याय पाहायला मिळणार आहे. तसेच, हा ट्विस्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2026 | 03:17 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सखा माझा पांडुरंग’मध्ये जलसमाधीचा थरार
  • सखुची अढळ भक्ती की विठुरायाचा चमत्कार?
  • ‘सखा माझा पांडुरंग’ चा विशेष भाग कधी?
 

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘सखा माझा पांडुरंग’ लवकरच प्रेक्षकांसाठी एक अत्यंत भावनिक आणि थरारक वळण घेऊन येत आहे. मालिकेत सखुच्या अढळ भक्तीची कठोर परीक्षा पाहायला मिळणार असून येणारा जलसमाधी विशेष भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

कथानकानुसार, सखु दिगूचे प्राण वाचवते. मात्र या घटनेचे श्रेय झिंग्रोबाला द्यावे यासाठी मनोरमा आणि नागोजी एक मोठे कारस्थान रचतात. सखुला अंधारात ठेवून झिंग्रोबाच्या पूजेची तयारी केली जाते. पण सत्य समजल्यावर सखु ठामपणे या खोट्या गोष्टींना नकार देते आणि सर्वांसमोर विठुरायावरचा तिचा अढळ विश्वास व्यक्त करते.

‘अनुपमा’मध्ये नवा ट्विस्ट; गोव्यात रुपाली गांगुलीची नवी सुरुवात; कॅफेच्या स्वप्नातून उभी करणार नवी ओळख

सखुचा हा निर्धार पाहून संतापलेला नागोजी गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण करतो. झिंग्रोबाचा कोप दाखवत तो सखुवर अमानुष अत्याचार करतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत सखु विठोबाची भक्ती सोडायला तयार होत नाही. तिची न डगमगणारी श्रद्धा आणि देवावरील नितांत विश्वास हा या कथानकाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

घटनांचा कळस गाठताना नागोजी एक धक्कादायक निर्णय घेतो सखुला तिच्या लाडक्या विठोबाच्या मूर्तीसह तळ्यात बुडवण्याचा. या जलसमाधीच्या प्रसंगात सखु आपल्या विठुरायाला कवटाळत मृत्यूला सामोरी जाते. आता या प्रसंगातून विठुराया सखूला कशा प्रकारे वाचवणार, हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.

दरम्यान, या विशेष भागाबद्दल बोलताना संत सखुबाईंची भूमिका साकारणारी बालकलाकार स्वराली खोमणे म्हणाली, “ही भूमिका साकारत असल्यापासून मला खूप सकारात्मकता जाणवते. जलसमाधीसारखे कठीण प्रसंग शूट करताना सुरुवातीला भीती वाटते, पण कॅमेरा सुरू झाला की सखुबाईंची हिम्मत माझ्यात येते. या आठवड्यात सखुबाईंची कठोर परीक्षा पाहायला मिळणार आहे. विठुराया त्यांना कशी मदत करेल, हे पाहण्यासाठी मीही उत्सुक आहे.”

किंग खानही पडेल फिका; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पुरुष कलाकरांनी तरुणींना लावले वेड, Dance असावा तर असा

ती पुढे म्हणाली की, “माझे आई-वडील आणि मालिकेची टीम मला खूप साथ देते. अभ्यास आणि शूटिंग यामध्ये समतोल साधणं कठीण असलं तरी त्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य होत आहे.” ‘सखा माझा पांडुरंग’मधील हा जलसमाधी विशेष भाग येत्या २९ मार्च रोजी दुपारी १:०० वाजता आणि सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित होणार आहे. सखुच्या भक्तीचा हा महासंग्राम आणि विठुरायाचा चमत्कार पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Web Title: Sakha majha pandurang jal samadhi special episode sakhubai devotion twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.