Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: अखेर रहस्य उलगडलं! ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’मध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची दमदार एन्ट्री; साकारणार मोहनची भूमिका

'सौभाग्यवती वृंदा मोहन' मालिकेत मोहनच्या भूमिकेत अभिनेता संग्राम समेळची दमदार एन्ट्री झाली आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल आणि मालिकेतील रहस्याबद्दल संग्रामने दिलेली खास प्रतिक्रिया जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 02:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘सन मराठी’वरील पहिली रहस्यमय मालिका ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर तिच्या वेगळ्या कथानकाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे मोहनची भूमिका नेमकी कोण साकारणार? अखेर या रहस्यावरचा पडदा उठला असून, लोकप्रिय अभिनेता संग्राम समेळ मोहनच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दररोज रात्री ९.४५ वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेने पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. रहस्य, थरार आणि भावनांचा संगम असलेल्या या मालिकेत संग्राम समेळची एन्ट्री कथानकाला आणखी वेगळं वळण देणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना संग्राम समेळ म्हणाला, “अखेर मोहनची भूमिका कोण साकारणार, याचा उलगडा प्रेक्षकांसमोर झाला आहे. मोहन ही अतिशय सुंदर आणि भावनिक व्यक्तिरेखा आहे. तो आपल्या कुटुंबावर आणि वृंदावर मनापासून प्रेम करणारा आहे. मात्र, वृंदा आणि मोहन यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.”

DADA The Sourav Ganguly Story: ‘दादा’च्या भूमिकेत राजकुमार राव; सौरव गांगुली बायोपिकचा फर्स्ट लुक प्रदर्शित, रिलीज डेटही आली समोर

तो पुढे म्हणाला, “आमची मालिका एखाद्या थ्रिलर सिरीजप्रमाणे आहे. आजची युवा पिढी ओटीटीवरील थ्रिलर कंटेंट मोठ्या प्रमाणावर पाहते. त्यामुळे ही मालिका त्यांनाही नक्की आवडेल. पहिला भाग पाहिल्यानंतर पुढे काय होणार, याची उत्सुकता कायम राहील. विशेष म्हणजे, मोहन आणि माझ्यात अजिबात साम्य नाही. त्यामुळे ही भूमिका साकारणं माझ्यासाठी मोठं आव्हान आहे.”

New Marathi Serial: तब्बल १८ वर्षांनंतर ‘हा’ मराठी अभिनेता छोट्या पडद्यावर; ‘इच्छाधारी नागीन’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

वर्षभरानंतर पुन्हा ‘सन मराठी’वर मुख्य भूमिकेत परतल्याचा आनंद व्यक्त करताना संग्राम म्हणाला, “मी या मालिकेचा नायक असल्याचं गुपित जपणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मालिकेचे प्रोमो एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत होते, पण मी काहीच सांगू शकत नव्हतो. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली. आता सोशल मीडियावर चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे.”

तो पुढे म्हणाला, “आमच्या मालिकेची संपूर्ण टीम खूप छान आहे. त्यामुळे काम करताना खूप मजा येते. प्रेक्षकांना जशी पुढे काय होणार याची उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता आम्हा कलाकारांनाही आहे. माझ्या आधीच्या भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांनी मोहनवरही भरभरून प्रेम करावं आणि आमच्या मालिकेला असंच पाठबळ द्यावं.”

रहस्य, थरार आणि भावनिक नात्यांचा वेध घेणारी ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ ही मालिका दररोज रात्री ९.४५ वाजता ‘सन मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Sangram samel enters saubhagyavati vrunda mohan mystery thriller emotions take center stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • tv serial

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
1

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
2

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
3

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
4

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.