Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sun Marathi New Serial: हरवलेल्या मोहनचा शोध, रहस्याचा थरार! ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ ६ जुलैपासून ‘सन मराठी’वर

Sun Marathi New Serial: 'सन मराठी'वर ६ जुलैपासून सुरू होणारी 'सौभाग्यवती वृंदा मोहन' ही रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेली नवी मालिका प्रेक्षकांना एका हरवलेल्या पतीच्या शोधाचा रोमांचक प्रवास दाखवणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 03, 2026 | 12:08 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘सन मराठी‘ वाहिनी प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेली नवी मालिका ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ घेऊन येत आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच त्यातील गूढ कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका हरवलेल्या पतीच्या शोधात निघालेल्या वृंदाचा संघर्ष, तिच्यासमोर उलगडणारी रहस्ये आणि प्रत्येक भागात वाढणारा थरार ही या मालिकेची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.

मालिकेत वृंदा आपल्या हरवलेल्या पती मोहनच्या शोधासाठी मुंबईत येते. या प्रवासात तिचा एका अनोळखी कुटुंबाशी सामना होतो आणि त्यानंतर एकामागोमाग एक रहस्ये उलगडू लागतात. मोहन नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की नाही? त्याच्या गायब होण्यामागे कोणते गूढ दडले आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वृंदाचा प्रवास प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे.

एका साध्या आणि निरागस स्त्रीचा धाडसी, जिद्दी आणि खंबीर प्रवास ही या मालिकेची खरी ताकद आहे. कथानकासोबतच मालिकेत लोकप्रिय कलाकारांचीही मोठी फौज पाहायला मिळणार आहे. सुहिता थत्ते, परी तेलंग, अक्षता नाईक, सुखदा बोरकर, स्नेहा मंगल, आशिष जोशी, आशिष वझे आणि किरण डांगे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे, मालिकेचं नाव ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ असलं तरी मोहनची भूमिका कोण साकारणार, याचा सस्पेन्स अद्याप कायम ठेवण्यात आला आहे.

ही मालिका ६ जुलैपासून दररोज रात्री ९.४५ वाजता ‘सन मराठी’वर प्रसारित होणार आहे.

Lock Upp 2 Viral Video: ‘ब्लँकेटच्या आत ये..’, योगेश-आकांक्षाच्या व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा; ब्रेकअपनंतर पुन्हा वाढली जवळीक?

मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे आणि महाबळेश्वर असून दिग्दर्शनाची धुरा अजय मयेकर यांनी सांभाळली आहे. मालिकेविषयी बोलताना अजय मयेकर म्हणाले, “‘सन मराठी’वर प्रत्येक मालिकेतून प्रेक्षकांना नवा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ ही वाहिनीवरील पहिली रहस्य आणि थरारप्रधान मालिका आहे. वृंदा आपल्या हरवलेल्या नवऱ्याच्या शोधासाठी मुंबईत येते. सर्वजण तिला तिचा नवरा या जगात नसल्याचं सांगतात, पण ती हार मानत नाही. सावित्रीने जशी आपल्या निष्ठा आणि धैर्याच्या बळावर सत्यवानाला परत मिळवलं, तशीच वृंदाही प्रत्येक संकटाचा सामना करत आपल्या पतीचा शोध घेते. हा प्रवास प्रत्येक स्त्रीला जिद्द, इच्छाशक्ती आणि धैर्याचा संदेश देणारा आहे.”

Saubhagyavati Vrinda Mohan, Sun Marathi, Marathi Serial, New Marathi Serial, Swati Bhingardive, Ajay Mayekar, Mystery Serial, Marathi TV Shows, Entertainment News, TV News

मालिकेत वृंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे म्हणाली, “वृंदा हे अत्यंत धाडसी पात्र आहे. कोणतीही ओळख नसताना मुंबईत येऊन आपल्या नवऱ्याचा शोध घेणं हे मोठं आव्हान आहे. ती आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक संकटाला सामोरी जाते. या प्रवासात प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.”

रहस्य, थरार, भावना आणि एका स्त्रीच्या जिद्दीची कहाणी अनुभवण्यासाठी प्रेक्षक आता ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Saubhagyavati vrinda mohan a mystery thriller packed with suspense and emotions premieres on sun marathi from july 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • sun marathi

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
1

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
4

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.