Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' मालिकेच्या टीमने पंढरपुरात 'स्वर पंढरी' कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा केला. प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, साईराज केंद्रे आणि वेदांती भोसले यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारकऱ्यांसोबत भक्तिरंगात सहभाग घेतला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 01:47 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’चा प्रवास ज्या पवित्र पंढरपूरच्या भूमीतून सुरू झाला, त्याच ठिकाणी मालिकेच्या टीमने यशाचा खास टप्पा साजरा केला. मालिकेच्या दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त झी मराठीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर पंढरी’ या भक्तिमय कार्यक्रमातून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर, सारंगची भूमिका करणारा साईंकित कामत, अबीरची भूमिका साकारणारा साईराज केंद्रे आणि ओवीची भूमिका साकारणारी वेदांती भोसले हे कलाकार पारंपरिक वेशभूषेत पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले तसेच वारकऱ्यांसोबत भक्तिरंगात सहभागी होत हा खास अनुभव घेतला.

“मी सतत विठुरायाला साकडं घालत होते” – प्राप्ती रेडकर

सावलीची भूमिका साकारणाऱ्या प्राप्ती रेडकर हिने पंढरपूर वारीचा अनुभव शेअर करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मालिकेत सावलीची भूमिका साकारताना मला दोन वेळा वारीला जाण्याचा योग आला. याआधीही मी एकदा गेले होते. यंदा माझं चौथं वर्ष होतं. विठुरायाच्या मनात असेल तरच त्याचं दर्शन घडतं, असं म्हणतात. मला चार वेळा दर्शन मिळालं, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

वारीतील अनुभव सांगताना प्राप्तीने वारकऱ्यांच्या प्रेमळ स्वभावाचंही कौतुक केलं. “सोबतचे वारकरी खूप गोड आणि प्रेमळ असतात. स्वतःकडे खायला नसलं तरी दुसऱ्याला आधी खायला देतील. वारीमध्ये चालताना, शूट करतानाही थकवा जाणवला नाही. हे बळ विठुरायाच देतो,” असं ती म्हणाली.

‘स्वर पंढरी’मुळे पूर्ण झाली विठ्ठल दर्शनाची इच्छा

यंदा पंढरपूरला शूटसाठी जाण्याचं ठरलं होतं, मात्र वारीत सहभागी होता येईल की नाही याबाबत निश्चितता नव्हती. त्यावेळी विठ्ठल दर्शनाची इच्छा व्यक्त करत प्राप्ती म्हणाली, “मी सतत विठुरायाला साकडं घालत होते की काहीतरी कर, जेणेकरून मला दर्शन मिळेल.”

यानंतर झी मराठीच्या ‘स्वर पंढरी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तिची ही इच्छा पूर्ण झाली. या कार्यक्रमात वारकरी, पंढरपूरमधील गावकरी, अंध मुलं तसेच अनेक कलाकार सहभागी झाले होते. केतकी माटेगावकरच्या गाण्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी या भक्तिमय सोहळ्याची रंगत वाढवली.

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

वारकऱ्यांच्या प्रेमाचा भावनिक अनुभव

गेल्या वर्षी वारीदरम्यान झालेला एक अनुभव सांगताना प्राप्ती भावूक झाली. शूटिंगमध्ये तिचे आई-वडील हरवल्याचा सीन होता. त्यावेळी ती वारकऱ्यांना आई-वडिलांबद्दल विचारत होती. अनेक वारकरी स्वतःची दिंडी सोडून तिच्या मदतीला पुढे आले होते.

तसंच, एका चाहतीने केलेल्या कौतुकाचा किस्साही तिने सांगितला. “एक काकी अचानक माझ्या पाया पडल्या. मी त्यांना थांबवलं, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘सावली, तुझी भेट झाली आणि तुझ्यातच आम्हाला पंढरी दिसली.’ हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता,” असं प्राप्तीने सांगितलं.

‘सावळ्याची जणू सावली’च्या टीमसाठी पंढरपूरचा हा प्रवास केवळ शूटिंगचा भाग नसून, भक्ती, प्रेम आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाचा खास अनुभव ठरला.

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क

Web Title: Savalyachi janu savali celebrates its success in pandharpur team marks the occasion with a special appearance at swar pandhari event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार
1

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या
2

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
3

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
4

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.