( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
वैयक्तिक आयुष्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत चिरागने नुकतीच Mercedes-Benz GLE ही आलिशान एसयूव्ही खरेदी केली आहे. या लक्झरी कारची किंमत सुमारे १.४५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
नव्या कारची माहिती चिराग पाटीलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नव्या Mercedes-Benz GLE AMG Coupéसोबतचे खास फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, “IT’S FINALLY HERE… माझी नवीन Mercedes GLE AMG Coupé!” असं लिहिलं आहे.
या आलिशान एसयूव्हीमध्ये आकर्षक कूपे डिझाइन, दमदार इंजिन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम इंटिरिअर आणि प्रगत सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार मर्सिडीजच्या सर्वाधिक लोकप्रिय लक्झरी मॉडेल्सपैकी एक मानली जाते. भारतात या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत साधारण १.४५ कोटी रुपये आहे.
चिरागच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. चाहते, अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्याचं अभिनंदन केलं असून, नव्या कारसाठी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, त्याच्या नव्या लक्झरी कारची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
मराठी चित्रपट ‘वजनदार’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या चिरागने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा आहे.मराठी चित्रपटसृष्टीसोबतच त्याने हिंदी चित्रपटांमध्येही दमदार कामगिरी केली आहे. ‘८३’, तसेच ‘चार्जशीट’ आणि ‘ले गया सद्दाम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही चिरागने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. विविध भाषांतील चित्रपटांमधून सातत्याने दर्जेदार भूमिका साकारत तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका






