Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubhankar Tawde : अवघ्या दशकानंतर शुभंकर तावडे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर! येतेय नवीन मालिका

Shubhankar Tawde जवळपास दशकानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून तो स्टार प्रवाहच्या Pathrakhin मालिकेत आलोक सूर्यवंशीची भूमिका साकारत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 22, 2026 | 09:37 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • जोडीला त्याचा सख्खा लहान भाऊ म्हणून आरव सूर्यवंशी हे पात्र अभिनेता आशय कुलकर्णी साकारणार आहे.
  • आरवचा त्याच्या मोठ्या भावावर आलोक सूर्यवंशीवर जीवापाड प्रेम आहे.
  • आशय कुलकर्णीने आरव सूर्यवंशीचे पात्र साकारले
Shubhankar Tawde : अभिनेता शुभंकर तावडे जवळपास दशकानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला TV क्षेत्रात काम करताना पुन्हा एकदा पाहण्यासाठी त्याचे चाहतेमंडळी उत्सुक आहेत. अभिनेता स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘पाठराखीण’ मध्ये झळकणार आहे. पाठराखीण मालिकेत प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेत्री गौरी इंगवले या दोन बहिणी आणि त्यांच्या नात्यावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. याच मालिकेत आलोक सूर्यवंशीच्या भूमिकेत शुभंकर तावडे दिसून येणार आहे. तर त्याच्या जोडीला त्याचा सख्खा लहान भाऊ म्हणून आरव सूर्यवंशी हे पात्र अभिनेता आशय कुलकर्णी साकारणार आहे.

Cockroach Janata Party ला दिग्दर्शक हेमंत ढोमेचा पाठिंबा; म्हणाला, “लोकशाहीसाठी हा सकारात्मक संकेत!”

कसे असणार शुभंकर तावडेचे पात्र?

शुभंकर तावडे आलोक सूर्यवंशी नावाचे पात्र साकारणार आहे. शुभंकर दिसायला देखणा असा दाखवण्यात आला आहे परंतु त्याचा स्वभाव जरा गुंतागुंतीचा दाखवण्यात आला आहे. त्याला मोठ्या आवाजाची भीती वाटते, जर काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध घडल्या तर त्याला त्या सहन होत नाहीत. एकंदरीत, त्याचा स्वभाव इतका गुंतागुंतीचा आहे की स्वतःला इजा पोहचवायलाही तो मुलगा मागेपुढे पाहत नाही.

कसे असणार आशय कुलकर्णीचे पात्र?

अभिनेता आशय कुलकर्णीने आरव सूर्यवंशीचे पात्र साकारले आहे. परदेशातून शिक्षण घेऊन आलेला आरव स्वभावाने समजूतदार आहे. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचे कौशल्य त्यात उत्तम आहे. आरवचा त्याच्या मोठ्या भावावर आलोक सूर्यवंशीवर जीवापाड प्रेम आहे.

काय आहे दोन्ही अभिनेत्यांचे म्हणणे?

शुभंकर तावडे म्हणतो की, ““टेलिव्हिजन या माध्यमाबद्दल मला कायमच विशेष आदर वाटतो, कारण माझ्या अभिनय प्रवासाची सुरुवात याच माध्यमातून झाली. गेल्या काही काळात चित्रपट आणि वेब सीरिजच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र ‘पाठराखीण’मधील भूमिका माझ्यासमोर आली आणि पहिल्याच क्षणी ती मला खूप आवडली. अशा प्रकारचं पात्र साकारण्याचं धाडस सहसा फार कमी कलाकार करतात. आलोक हा नेहमीसारखा टिपिकल हिरो नसून त्याच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू प्रेक्षकांना हळूहळू पाहायला मिळतील.”

System : मराठमोळा अभिनेता आता सिस्टम हलवणार! आदिनाथ कोठारे झळकणार महत्वाच्या भूमिकेत

आशय कुलकर्णी म्हणाला की, “आरव हा परदेशातून शिक्षण पूर्ण करून आलेला, समजूतदार आणि कुटुंबातील सगळ्यांचा लाडका मुलगा आहे. आपल्या मोठ्या भावावर म्हणजेच आलोकवर त्याचं मनापासून प्रेम असून त्याच्याशी त्याचं खास नातं आहे. शांत स्वभाव आणि समोरच्याच्या भावना समजून घेण्याची वृत्ती ही आरवची जमेची बाजू आहे. शुभंकर माझा खूप जवळचा मित्र असला तरी आम्हाला याआधी एकत्र काम करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, या मालिकेमुळे ती इच्छा पूर्ण झाली. प्रेक्षक या मालिकेला भरभरून प्रेम देतील, असा मला विश्वास आहे.”

Web Title: Shubhankar tawade new serial pathrakhin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Ritu Tawde
  • Shubhankar Tawde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.