Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushma Murudkar: ‘म्हणाले Compromise, पण मनात होतं भलतंच’ मराठी अभिनेत्रीसोबत हिंदीमध्ये घडलेला तो थरार! कास्टिंगचा भयानक अनुभव

‘कमळी’ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुषमा मुरुडकर सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. सोशल मीडियावर ती विविध विनोदी जोक्स तसेच मनोरंजक कंटेंट शेअर करत असते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2026 | 03:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

‘कमळी’ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुषमा मुरुडकर सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. सोशल मीडियावर ती विविध विनोदी जोक्स तसेच इतर अनेक मनोरंजक कंटेंट शेअर करत असते. अभिनेत्री सुषमा मुरुडकर आणि अभिनेत्री केतकी कुलकर्णी यांची सोशल मीडियावरील जुगलबंदी नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, सुषमा मुरुडकरने एका मुलाखतीत हिंदी मालिकांमध्ये काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीला हिंदी क्षेत्रात काम करताना अनेक धक्कादायक अनुभवांना सामोरे जावे लागले.

हातात अंगठी अन्…, तृषा कृष्णनने गुपचूप उरकला साखरपुडा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

त्याविषयी मुलाखतीत सांगताना सुषमा म्हणते “त्याकाळी माझ्याकडे एक मित्र होता – माझा मोबाईल फोन! मी तेव्हा TikTok करायची. मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसले होते. तेव्हा EP माझ्याजवळ आला. मी त्याला सांगितले की लांब राहा. तेव्हा त्याने मला सांगितले की, ‘तू अशी वागलीस तर तुझ्या आत्महत्येचा सीन करावा लागेल. तुला तुझ्या कामाचा मोबदलाही कमी दिला जाईल.’ तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘ओके, मला चालेल.'” अभिनेत्री पुढे सांगते, “या गोष्टी माझ्यासोबत हिंदी क्षेत्रात घडल्या. तेव्हापासून मी हिंदी क्षेत्राला जय महाराष्ट्र केला आणि मराठीमध्ये काम करू लागले. भले कमी पैसे मिळत असतील, पण मराठीमध्ये मला अधिक सुरक्षित वाटते. आपलेपणा जाणवतो.”

पुढे सुषमाने हिंदी क्षेत्रातील एका फिल्मच्या ऑडिशनचा थरारही शेअर केला. ती म्हणते “मी ऑडिशनसाठी गेले होते. माझ्यासोबत 12 ते 13 मुली होत्या. तेव्हा एक माणूस रूममध्ये आला आणि म्हणाला, ‘Compromise साठी तयार असाल तरच पुढे या.’ मला ‘Compromise’ म्हणजे शूटिंगची अडचण, लोकेशन दूर असणे किंवा जास्त वेळ लागणे असे वाटले. मी मेहनतीसाठी तयार होते, म्हणून मी होकार दिला. मला आश्चर्य वाटले की त्या 12–13 मुलींमध्ये फक्त मीच हात वर केला होता. मग त्या माणसाने मला बाहेर नेले आणि सांगितले, ‘उद्या या पत्त्यावर साडी नेसून या.’ दुसऱ्या दिवशी मी साडी नेसून त्या ठिकाणी पोहोचले. तिथे मला हिंदी क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्रीही दिसली. माझ्या मागे दोन बाउन्सर होते. मला वाटले की मी इतकी प्रसिद्ध झाले की मला बाउन्सर मिळाले आहेत. ते दोघे मला जिन्यावरून वर घेऊन गेले. वर गेल्यावर पाहिले तर प्रोड्युसर अर्धनग्न अवस्थेत बसलेला होता. मी लगेच तिथून खाली पळाले.”

Aamir Khan Productions 25 Years: ऑस्करपासून जागतिक बॉक्स ऑफिसपर्यंत; आमिर खान प्रोडक्शन्सच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासावर एक नजर

अभिनेत्री पुढे सांगते, “खाली त्या अभिनेत्रीला पाहूनच मला थोडा अंदाज आला होता. वर गेल्यावर मला कळले की ‘Compromise’ म्हणजे नेमके काय असते.” सध्या अभिनेत्री सुषमा मुरुडकर झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ या मालिकेत अनिका महाजनच्या आईची भूमिका साकारत आहे.

Web Title: Sushma murudkars harrowing casting couch experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
1

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
3

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.