Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक रंजक आणि भावस्पर्शी वळण येणार आहे. अक्कलकोटमध्ये दरोडे घालणारा सावळ्या आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी सावकार गोवर्धनची मुलगी इराचं अपहरण करतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 03:11 PM
Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मालिकेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवं भावस्पर्शी वळण येणार.
  • इराचं अपहरण करताना सावळ्याच्या ताब्यात स्वामी समर्थही येतात.
  • स्वामी सावळ्याच्या घरी गणपती बसवण्याचा निर्णय घेतात; पण सावळ्याचा विरोध हे मोठं आव्हान ठरणार.
 

Jay Jay Swami Samarth latest Episode: कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत अक्कलकोटमध्ये गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मालिकेच्या कथानकात आता एक अत्यंत रंजक आणि भावस्पर्शी वळण येणार आहे. “उत्सव बाप्पाचा… लीला स्वामींची…” या मध्यवर्ती विचारातून गणपती बाप्पाचं आगमन केवळ एका घरात होणार नाही, तर एका दरोडेखोराच्या आयुष्यातही एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.१० वा. आपल्या कलर्स मराठीवर.Jai Jai Swami Samarth Marathi Serial:

स्वामी समर्थांचंही अपहरण

अक्कलकोटमध्ये दरोड्यांचा सुळसुळाट माजवणारा तरुण दरोडेखोर सावळ्या आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी सावकार गोवर्धनची मुलगी इराचं अपहरण करतो. योगायोगाने इरासोबत स्वामी समर्थांचंही अपहरण होतं. मात्र, स्वामींचं हे अपहरणही त्यांच्या इच्छेनेच घडलेलं असतं. सावळ्याच्या ताब्यात राहून स्वामी त्याच्या राग, द्वेष, सूड आणि हिंसक वृत्तीवर काम करू लागतात. याच दरम्यान इराच्या मनात तिच्या घरच्या गणपतीची ओढ आहे. Jai Jai Swami Samarth Marathi Serial:

घरातच गणपतीची स्थापना

आई-वडिलांपासून दूर असतानाही गणेशोत्सव साजरा करण्याची तिची इच्छा स्वामी ओळखतात. तिच्या मनातील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी सावळ्याच्या घरातच गणपतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतात. पण एक मोठा प्रश्न उभा राहतो—ज्या सावळ्याने आयुष्यात कधी देवासमोर हात जोडले नाहीत, तो आपल्या घरात गणपती बसवणार कसा?

घरात गणपती येणार

स्वामी मात्र ठाम असतात. सावळ्याला जेव्हा स्वामी सांगतात की यंदा त्याच्या घरात गणपती येणार आणि गणपतीची मूर्ती तो स्वतः घेऊन येणार, तेव्हा तो स्वामींना स्पष्ट नकार देतो. “मी दरोडेखोर आहे. माझ्या हातून देवाची पूजा होणार नाही. मी गणपती बसवणार नाही,” असा त्याचा ठाम पवित्रा असतो. स्वामी मात्र मिश्कीलपणे त्याला जणू आव्हानच देतात आयुष्यभर देवासमोर हात जोडले नाहीत, हे भूषण नाही.

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…

आता हात जोडायचे! आणि त्याहूनही गूढ संकेत देताना स्वामी सांगतात की, “घरात विघ्नहर्ता येईल तेव्हाच तुझ्या आयुष्यातलं विघ्न दूर होईल.” सावळ्या आपलं विघ्न स्वतःच दूर करण्याचा निर्धार करून स्वामींचं आव्हान स्वीकारण्यास नकार देतो. पण स्वामी सुद्धा स्पष्ट सांगतात – “तेरी जिद से ज्यादा हमारी जिद बडी है… या घरात गणपती तर बसणारच – तू स्वतःहून बसवणार!”

स्वामींच्या लीलेतून सावळ्याला एकामागून एक संकेत

इथून सुरू होते स्वामींच्या लीलेची अद्भुत अनुभूती. स्वामींच्या लीलेतून सावळ्याला एकामागून एक संकेत मिळत जातात. सावल्या गणपती घरी घेऊन येण्यासाठी होकार देईल का ? ह्यातून उठणार अनेक प्रश्न – एका दरोडेखोराच्या हातून स्वामी करवून घेतायत गणपतीची स्थापना… का? गणपतीच्या आगमनाने सावळ्याच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार?

स्वामी आणि सावळ्यामधला हा केवळ जिद्दीचा सामना आहे, की एका दरोडेखोराच्या परिवर्तनाची ही सुरुवात आहे? बाप्पाच्या आगमनाने सावळ्याच्या आयुष्यातील कोणतं विघ्न दूर होणार? कारण स्वामींच्या लीलेत प्रत्येक घटना केवळ घटना नसते त्यामागे एक संकेत असतो, एक हेतू असतो आणि योग्य वेळी उलगडणारं एक सत्य असतं.

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

“प्रारब्ध स्वामींशी जोडलेलं असेल, तर दुर्दैवाच्या फेर्‍यातून स्वामी भक्ताची सुटका करून त्याला सुदैवाशी जोडतात.” गणेशोत्सवाच्या निमित्ताने सावळ्याच्या घरात येणार आहे बाप्पा… पण त्याच्यासोबत येणार आहे श्रद्धेचा पहिला किरण, सद्बुद्धीची चाहूल आणि एका कठोर मनाच्या परिवर्तनाची सुरुवात. उत्सव बाप्पाचा… लीला स्वामींची… आणि बदल एका आयुष्याचा! गणपती बाप्पा मोरया! पाहायला विसरू नका ……

Web Title: Swami to bring ganpati bappa to a dacoits home in a heart touching twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती
1

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…
2

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या
3

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!
4

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.