Janhvi Killekar on Dahi Handi Event: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अल्ट्रा मराठी बझ ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये जान्हवी म्हणाली, “खरं तर माझ्यासाठी हा विषयच महत्त्वाचा नाही. पण लोकांनी फक्त कॅप्शन वाचून काहीही अर्थ काढू नये. ‘जान्हवी भडकली’ असं लिहिलं की लोक लगेच विश्वास ठेवतात. आपण सगळेच कधी ना कधी रागावतो. मलाही राग येतो. पण मी सहसा पब्लिकमध्ये रिऍक्ट होत नाही. कधी कधी परिस्थिती अशी बनते की आपण रागावलोय हेच आपल्याला कळत नाही. नाहीतर लोक आपल्याला गृहीत धरतात.”तिने पुढे सांगितलं की त्या दिवशी नेमकं काय झालं.Janhvi Killekar on Dahi Handi Event:
जान्हवी म्हणाली, “त्यादिवशी मला तो इव्हेंट करून दुसऱ्या इव्हेंटला जायचं होतं. दीड तासाचा रस्ता होता. स्टेजवर सुरुवातीला कोणीच काही बोलत नव्हतं. फक्त डीजे वाजत होता आणि लोक नुसते उभे होते. कोणी नाचत पण नव्हतं. मग एक कलाकार म्हणून मला वाटलं की काहीतरी बोलायला हवं. मी आयोजकांना सांगितलं की माईक माझ्याकडे द्या, मी बोलते.”
“मी माईक घेतल्यावर अँकरला जाग आली. त्याने लगेच घोषणा केली. बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर आपल्यासोबत आहेत, आणि लगेच त्याने त्या रीलस्टारचं पण नाव घेतलं. तो म्हणाला की या दोघी आता तुमच्याशी बोलणार आहेत, डायलॉग म्हणणार आहेत.मला तिथेच राग आला. अरे माईक माझ्या हातात आहे. मी बोलणार आहे. आणि तू दुसऱ्या कोणाचं नाव घेतोयस. कोणाच्या हातात माईक आहे आणि कोण बोलणार आहे याचं तरी भान ठेवा. मला त्या रीलस्टारचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम होता अँकरच्या बेशिस्तपणाचा. पण व्हिडिओमध्ये फक्त मी चिडलेली दिसले, त्यामागचं कारण कोणालाच कळलं नाही. लोक गैरसमज करतात”
“बिग बॉसपासून लोकांना वाटतं मी आगाऊ आहे, सतत भडकते. पण तसं नाही. जर मी खरंच भडकत असते तर मला कोणी इव्हेंटला बोलावलं असतं का? मी आजपर्यंत इतके इव्हेंट केले आहेत. लोकांना माझा स्वभाव आवडतो म्हणूनच ते बोलावतात. हे लोकांना कळत नाही.”खरं तर जान्हवी बिग बॉसमध्ये पण अशीच होती, जे मनात ते तोंडावर बोलणारी.
त्यामुळे तिचे चाहते पण तसेच आहेत. तिला आवडलं नाही की ती लगेच बोलते. या व्हिडिओमुळे तिला ट्रोल पण केलं गेलं. पण तिने आता सगळं क्लिअर केलंय. तिचा राग त्या रीलस्टारवर नव्हता तर आयोजकांच्या गोंधळावर होता.






