Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव

Tejaswini Lonari: अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्या लेकाचा ९ सप्टेंबरला नामकरण सोहळा पार पडला. चिमुकल्याचं नाव ‘चार अक्षरी’ ठेवण्यात आलं आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • By अमृता यादव
Updated On: Sep 10, 2026 | 09:06 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • थाटात पार पडला तेजस्विनी लोणारच्या लेकाचा नामकरण सोहळा 
  • चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव
  • फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Tejaswini Lonari: प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि तिचे पती, शिवसेना नेते समाधान सरवणकर यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. तेजस्विनीने २२ ऑगस्ट रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे सध्या सरवणकर कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या लाडक्या लेकाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तेजस्विनी-समाधान यांच्या लेकाचं नाव ठरलं

तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी आपल्या लेकासाठी खास आणि चार अक्षरी नाव निवडलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव ‘समराज’ असं ठेवण्यात आलं आहे. आपल्या नावांशी साधर्म्य असलेलं हे नाव असल्याने चाहत्यांचंही लक्ष वेधलं जात आहे.

नामकरण सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तेजस्विनी आणि समाधान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चिमुकल्याच्या आगमनानंतर आता त्याचं नाव काय असेल, याची उत्सुकता चाहत्यांना होती. अखेर नामकरण सोहळ्यात त्याचं नाव समोर आलं आहे.

Bigg Boss Season 20 : कॅमेऱ्यांपासून कोणतेही गुपित लपून राहत नाही! ‘बिग बॉस’मध्ये कसा समोर येतो सेलिब्रिटींचा खरा चेहरा?

डिसेंबर २०२५ मध्ये झालं होतं लग्न

तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी डिसेंबर २०२५ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. २२ ऑगस्ट २०२६ रोजी तेजस्विनीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता ९ सप्टेंबरला चिमुकल्या समराजचा नामकरण सोहळा पार पडला.

प्रिया सरवणकरांनी दिली होती गोड बातमी

तेजस्विनीच्या आई होण्याची बातमी समोर येण्यापूर्वी तिची नणंद आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या प्रिया सरवणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आत्या झाल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर तेजस्विनी आणि समाधान यांनीही आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.

आता ‘समराज’ या नावाची घोषणा झाल्यानंतर तेजस्विनी आणि समाधान यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बारशाच्या फोटोंवर चाहते चिमुकल्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव

Web Title: Tejaswini lonari samadhan sarvankar baby boy name samraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Tejaswini Lonari

संबंधित बातम्या

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात
1

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
2

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
3

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
4

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.