
Upendra Limaye to Host Crime Patrol Marathi: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘क्राइम पेट्रोल’ ही मालिका आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठीवरील ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये करणार आहेत. सजगता, सतर्कता आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश देणारी ही मालिका २६ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सोनी मराठी आणि Sony LIV वर पाहता येईल. Upendra Limaye to Host Crime Patrol Marathi:
“चुकीच्या विचारांना करा DELETE आणि चांगले विचार करा VIRAL, कारण आता जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच!” हा संदेश घेऊन ‘क्राइम पेट्रोल मराठी’ प्रेक्षकांना दैनंदिन आयुष्यात अधिक सजग राहण्याचे आवाहन करणार आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहणे, प्रश्न विचारणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे यांचे महत्त्व या मालिकेतून अधोरेखित होईल.
सत्य घटनांवर आधारित कथांमधून गुन्ह्यांचा वेध घेतानाच, धोक्याचे संकेत ओळखणे आणि कुणावरही विश्वास ठेवताना खबरदारी घेणे किती गरजेचे आहे, याची जाणीव प्रेक्षकांना करून दिली जाईल.
या मालिकेशी जोडले गेल्याबद्दल उपेंद्र लिमये म्हणाले, “एक अभिनेता म्हणून कथांचा लोकांच्या मनावर किती प्रभाव पडू शकतो, हे मी पाहिलं आहे. ‘क्राइम पेट्रोल मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि सतर्क राहायला प्रोत्साहित करण्याचा माझा प्रयत्न असेल. आज कोणतीही गोष्ट काही क्षणांत व्हायरल होते.
अशा वेळी जनजागृती करणारे संदेश आणि चांगले विचारही लोकांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. सोनी मराठीसोबत हा संदेश पुढे घेऊन जाताना मला आनंद होत आहे. कारण अधिक सुरक्षित समाज घडवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.”
जर तुम्हाला सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज आवडत असतील आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळावं असं वाटत असेल, तर ‘क्राईम पेट्रोल मराठी’ चुकवू नका. 26 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठीवर.