Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Part 2 Release Delayed: ‘रामायण’ पार्ट 2 ला मोठा झटका, रिलीज डेट पुढे ढकलली, चाहत्यांना आता दोन वर्ष वाट पहावी लागणार

Ramayana Part 2 Release Delayed: नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित करण्याचे नियोजन होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 24, 2026 | 04:04 PM
Ramayana Part 2 Release Delayed: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Ramayana Part 2 Release Delayed: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘रामायण पार्ट 2’ थेट 2028 च्या दिवाळीत येण्याची शक्यता.
  • रणबीर कपूर राम, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत.
  • भव्य VFX साठी निर्मात्यांना हवा अधिक वेळ.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा सध्या बॉलिवूडचा सगळ्यात मोठा सिनेमा मानला जातोय. ज्या सिनेमाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत, तो हाच आहे. रणबीर कपूर रामच्या भूमिकेत आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, आता मात्र दुसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली.जे ऐकून चाहत्यांना एक धक्का लागला. परंतू निर्मात्यांनी ‘रामायण पार्ट 2’ ची रिलीज डेट पुढे गेली आहे. Ramayana Part 2 Release Delayed:

काय होता आधीचा प्लॅन?

सुरुवातीला ठरलं होतं की हा सिनेमा दोन भागात येईल. पहिला भाग 2026 मध्ये आणि दुसरा भाग लगेच एका वर्षाने 2027 च्या दिवाळीत. म्हणजे प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.पहिल्या भागाचं नाव ‘रामायण: राइज ऑफ अ लीजेंड’ असं आहे आणि तो 5 नोव्हेंबरला थिएटरमध्ये येणार आहे, यात काही बदल नाही.

Ranbir Kapoor: ‘माझी जीभ घसरली…’;‘रामायण’च्या इव्हेंटमध्ये रणबीर कपूरकडून चूक? वक्तव्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी

पण दुसऱ्या भागाचं काय?

आता मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता नमित मल्होत्रा याने दुसरा भाग 2027 मध्ये न आणता थेट 2028 च्या दिवाळीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे दोन भागांमध्ये आता एका वर्षाचं नाही, तर दोन वर्षांचं अंतर पडणार आहे.

का पुढे ढकलला सिनेमा?

याचं कारण पण तसंच मोठं आहे. घाई का केली जात आहे, असा प्रश्न निर्मात्याला पडला.सूत्रांनी सांगितलं की, ‘रामायण’ हा फक्त एक सिनेमा नाही, तर नमित मल्होत्रा यांचं स्वप्न आहे. त्यांना हा सिनेमा जागतिक लेव्हलचा बनवायचा आहे. हॉलिवूडच्या ‘अवतार’ आणि ‘ॲव्हेंजर्स’ सारखा व्हीएफएक्स त्यांना या सिनेमात हवा आहे.

कोणत्याही प्रकारची तडजोड त्यांना करायची नाहीये.दुसऱ्या भागात तर खरी रामायणाची गोष्ट सुरू होणार आहे. युद्ध, रावण, वानरसेना, हे सगळं दुसऱ्या भागात असणार आहे. त्यासाठी प्रचंड व्हीएफएक्सचं काम लागणार आहे. शूटिंग, एडिटिंग आणि ग्राफिक्सला खूप वेळ लागतो. घाई करून सिनेमा खराब करण्यापेक्षा वेळ घेऊन चांगला सिनेमा बनवलेला बरा, असं निर्मात्याचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक सीनवर, प्रत्येक फ्रेमवर बारीक काम करण्यासाठी त्यांना जास्त वेळ हवा आहे. भारतीय प्रेक्षकांनी आजपर्यंत असा सिनेमा बघितला नसेल, असा अनुभव त्यांना द्यायचा आहे.

Ramayana: थिएटरनंतर ‘रामायण’ घरबसल्या पाहता येणार; नमित मल्होत्रा आणि ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मची ऐतिहासिक भागीदारी

पहिल्या भागावर सगळं लक्ष

आता दोन भागांमध्ये दोन वर्षांचं अंतर असल्याने पहिल्या भागावर जास्त जबाबदारी आली आहे. पहिल्या भागात राम, सीता आणि इतर पात्रांची ओळख होणार आहे. कथेची सुरुवात कशी झाली हे दाखवलं जाणार आहे.

पहिला भाग जर लोकांना आवडला, बॉक्स ऑफिसवर चालला, तरच लोक दुसऱ्या भागासाठी दोन वर्ष थांबतील. त्यामुळे 5 नोव्हेंबरला येणारा पहिला भाग कसा असतो, लोकांना आवडतो का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

अजून तरी निर्मात्यांनी 2028 ची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, पण दिवाळी 2028 हाच त्यांचा टार्गेट आहे. थोडं थांबावं लागेल, पण चांगली गोष्ट मिळेल अशी आशा करूया.

Web Title: Ramayana part 2 release date delayed diwali 2028 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Ramayana Movie

संबंधित बातम्या

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
1

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल
2

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती
3

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
4

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.