Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल

Suraj Chavan Welcomes Daughter: बिग बॉस मराठी 5 मधून लोकप्रिय झालेला सूरज चव्हाण बाबा झाला असून, त्याच्या लेकीचं नाव राधा आहे. जन्माष्टमीच्या दिवशी संजना हिने मुलीला जन्म दिला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सूरजने पत्नी संजना आणि लेक राधाचं घरी जंगी स्वागत केलं.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 24, 2026 | 03:23 PM
Suraj Chavan Welcomes Daughter ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Suraj Chavan Welcomes Daughter ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सूरज चव्हाणच्या लेकीचं नाव राधा.
  • दसऱ्याच्या मुहूर्तावर संजना आणि राधाचं घरी आगमन.
  • फुलं, रांगोळी आणि फुग्यांनी सजवलं घर.

Suraj Chavan Welcomes Daughter: बिग बॉस मराठी 5 गाजवणारा आपला लाडका सूरज चव्हाण आता पप्पा झालाय. सोशल मीडियावर जेव्हापासून हे कळलं तेव्हापासून फॅन्स सारखे विचारत होते, बाळ कधी दाखवणार, फोटो कधी टाकणार. आता अखेर सूरजने स्वतःहून आपल्या लेकीची झलक दाखवली आहे. त्याच्या बायकोने, संजनाने जन्माष्टमीच्या दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी तिचं नाव राधा असं ठेवलं आहे. राधा आल्यापासून सूरजच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. तो बाबा झाल्यावर किती खुश आहे हे त्याच्या व्हिडिओमध्येच दिसून येतं.

आजोळहून थेट बापाच्या घरी

सुरुवातीला बाळाचा जन्म झाला तेव्हा हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यावर संजना आणि बाळ दोघी आजोळी गेल्या होत्या. ही आपली पद्धतच आहे. आता जवळपास दीड महिना झाला. आणि दसऱ्याचा चांगला दिवस बघून सूरजने आपल्या दोन्ही लक्ष्मींना, म्हणजे बायको आणि लेकीला घरी आणलं.या दिवसाचं त्याने खूप प्लॅनिंग केलं होतं. साधं असं घरी आणलं नाही, तर एकदम सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टावर टाकला आणि काही वेळातच तो सगळीकडे पसरला. लोक सारखे तो व्हिडिओ शेअर करत आहेत.

स्वागत होतं असं भारी

सूरजने घर कसं सजवलं असेल याचा विचारच करा. घराच्या दारापासून आतपर्यंत फुलंच फुलं. सुंदर रांगोळ्या, लाईटचे झुम्बर, फुग्यांचं डेकोरेशन. बघणाऱ्याला वाटावं की लग्नच आहे की काय. पण ते होतं त्याच्या मुलीचं पहिलं घरात पाऊल.

 

Bagulbua: पहिल्यांदाच मराठीतील AI चित्रपट, ‘बागुलबुवा’ अभिजीत खांडकेकरसह 55 दमदार कलाकार झळकणार

व्हिडिओत छोटी राधा खूपच क्युट दिसते. गुलाबी कपड्यात गुंडाळलेली, शांत झोपलेली. सूरज तिला हातात घेताना त्याचे डोळे भरून आले होते. त्याने व्हिडिओला कॅप्शन दिलंय, “माझी लाडकी लक्ष्मी सोन पावलांनी घरी आली.” हे वाचून खूप जण इमोशनल झाले.

एका खेड्यातल्या साध्या पोराचा इथपर्यंतचा प्रवास पाहिला तर अभिमान वाटतो. बिग बॉस जिंकला, लग्न केलं आणि आता बाप झाला.सूरज आणि संजनाची लव्ह स्टोरीखूप जणांना माहिती नसेल, डिसेंबर 2025 मध्ये सूरज आणि संजनाचं लग्न झालं. एकदम साधं लग्न, कोणताही मोठा गाजावाजा नाही. लग्नानंतर काही महिन्यातच संजना प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली.

ही बातमी बाहेर कशी आली माहितीये का?

जान्हवीने संजनाच्या बेबी शॉवरचा, म्हणजे चोर ओटीचा एक व्हिडिओ चुकून टाकला. तेव्हा सगळ्यांना समजलं की गुड न्यूज आहे. नंतर सूरजने पण हो, मी बाबा होणार आहे हे सांगितलं. संजना पण तिचे बेबी बंपचे व्हिडिओ टाकायची.

Dharau Marathi Movie Released: गोमाता आणि चिमुकल्याच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी! ‘धाराऊ’ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

तिचं डोहाळे जेवणाचं जेवन सुद्धा एकदम राजेशाही थाटात झालं. ते सगळं जान्हवीने स्वतः पुढे राहून केलं होतं. बिग बॉसमध्ये झालेली मैत्री तिने अजूनही जपून ठेवली आहे. जेव्हा राधा जन्माला आली तेव्हा जान्हवी पहिली व्यक्ती होती जी हॉस्पिटलमध्ये पळत गेली होती.

आता राधा घरी आली आहे. सूरजच्या आयुष्यात एक नवं पर्व सुरू झालं आहे. त्याच्या या नव्या प्रवासासाठी त्याला सगळीकडून शुभेच्छा मिळत आहेत.

Web Title: Suraj chavan welcomes daughter radha home grand celebration rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती
1

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
3

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज
4

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.