Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Jagannath : पावसाने अभिनेत्रीही त्रस्त! चक्क घरातच शिरलं पावसाचं पाणी, करावी लागली तारेवरची कसरत

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अभिनेत्री मीरा जगन्नाथलाही बसला आहे. नव्या घरात पाणी शिरल्याने ती स्वतः हातात मॉप घेऊन घरातील साचलेलं पाणी काढताना दिसली. हा त्रासदायक अनुभव तिने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे शेअर करत, "नक्की हे पाऊसच आहे की कुणाची वाईट नजर?" असा प्रश्न उपस्थित केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मीराने अचानक तिची तारेवरची कसरत शेअर केली.
  • मीरा घरामध्ये साचलेलं पाणी काढताना दिसत होती.
  • “नक्की हे पाऊसच आहे की कुणाची वाईट नजर?”
महाराष्ट्रभरात गेल्या काही दिवसांपासून जसे पावसाच्या चर्चा आहेत त्याचप्रमाणे मराठी सिनेप्रेमींच्या चर्चेत मीरा जगन्नाथ हे नाव गेल्या काही काळापासून आहे. अगदी आठ्वड्याभरापूर्वी मीराच्या मुंबईतील नव्या घरी पूजा पार पडली आणि गेला आठवडा पावसाने मुंबईत हजेरी लावली. तेव्हापासून पावसाने काही विश्रांती घेतली नाही. अशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आनंदाची बातमी देणाऱ्या मीराने अचानक तिची तारेवरची कसरत शेअर केल्याने तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी सहानभूती दाखवली आहे.

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट

मीरा जगन्नाथने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये मीरा घरामध्ये साचलेलं पाणी काढताना दिसत होती. पोस्टच्या अगोदर कॅनडाचा एक भलामोठा धबधब्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे त्यापुढे तिने तिच्या घराची स्थिती दाखवली आहे. एकंदरीत, कॅनडाचा तो धबधबा पाहण्यासाठी इतके पैसे घालवून इतक्या दूर जाण्यापेक्षा तसाच अनुभव मला माझ्या घरी येत असल्याचे तिचे म्हणणे आहे. हातात मॉप घेऊन ती घरात साचलेलं पाणी काढत आहे.

या सगळ्यामध्ये अभिनेत्रीने एक महत्वाची गोष्ट तिने नमूद केले आहे की, “मिसिंग लिंकसुद्धा एका रात्रीत चालू झाला, पण माझ्या घरात साचलेलं हे पाणी काही संपण्याचा नाव घेत नाहीये. दिवसभर कामे करून घरी येते आणि अशी साफसफाई करत बसते. गेल्या तीन दिवसांपासून माझं हेच सुरु आहे. मी थकून गेलीये. मला समजेनासं झालंय की ‘नक्की हे पाऊसच आहे की कुणाची वाईट नजर?'”

अभिनेत्रीचे होणारे हाल पाहून तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे सांत्वन केले आहे. अभिनेत्रीला दुःखी पाहून मीरावर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये स्वतःचे दुःखही मांडले आहेत आणि या अडचणीतून मीराला लवकरच मार्ग मिळो अशी इच्छा असल्याचे सांगितलेय आहे.

अतुल कुलकर्णी भडकले! पोस्ट करत सरकारला लगावला टोला; Missing Link दरड कोसळीवर संताप, म्हणाले ‘ऱ्हास अटळ…’

मीरा जगन्नाथ ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मराठी मालिकांमधील दमदार भूमिका तसेच विविध रिअॅलिटी शोमधील सहभागामुळे तिने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीराने आजपर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या सुप्रसिद्ध मालिकेत साकारलेले पात्र आजही मालिका प्रेमींच्या मनावर राज्य करते.

Web Title: Mira jagannath shared a post after her new home was flooded due to heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता
1

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
2

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
3

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.