Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Sahal Marathi Movie: शाळेची सहल आणि गणपतीपुळेच्या प्रवासावर आधारित ‘सहल’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 02, 2026 | 11:47 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sahal Marathi Movie: शाळेची सहल म्हटलं की धमालमस्ती, गमतीजमती आणि मित्रांसोबतच्या असंख्य आठवणी डोळ्यांसमोर येतात. याच शाळेच्या सहलीभोवती फिरणारी एक मनोरंजक कथा आता ‘सहल’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ९ ऑक्टोबर रोजी ‘सहल’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

गणपतीपुळ्याच्या सहलीची रंगत

‘सहल’ची कथा एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणपतीपुळे सहलीभोवती फिरते. सहलीला जाण्यासाठी पैसे आवश्यक असतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंतर्गत संघर्ष, मुलींवरून होणारे वाद, तसेच सहलीसाठी पैसे देण्यास पालकांचा असलेला विरोध अशा अनेक गोष्टी कथेत पाहायला मिळणार आहेत.

शाळेच्या दिवसांतील निरागसपणा, समज-गैरसमज, त्या वयातील उत्साह आणि मुलींविषयी निर्माण होणारं आकर्षण या सगळ्या गोष्टी ‘सहल’च्या कथेतून पुन्हा अनुभवता येणार आहेत.

पालक आणि शिक्षकांचीही महत्त्वाची भूमिका

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक, शिक्षक आणि आजूबाजूचं वातावरण महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांची धमालमस्ती न दाखवता त्यांच्या भावविश्वावरही चित्रपट भाष्य करणार आहे. आज पालक असलेल्या प्रेक्षकांना आपल्या शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारी ही कथा असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

सिद्धेश खुपेरकरचं नायक म्हणून पदार्पण

के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मुकुंद वसंत खुपेरकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर हे चित्रपटाचे निर्माते असून, मुकुंद वसंत खुपेरकर सहनिर्माते आहेत.

‘सहल’मध्ये देविका दफ्तरदार, सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर, प्रज्वल सुतार, सेजल कोरे, सचिन मोरे, शिवाजी पाटील आणि रवि कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटातून सिद्धेश मुकुंद खुपेरकर मुख्य नायक म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील मालिकेत सुरजची भूमिका साकारली होती. याशिवाय डॉ. केशव हेगडेवार यांची बालभूमिकाही त्याने साकारली आहे.

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर

गीत-संगीताचीही खास मेजवानी

चित्रपटाचं छायांकन अभिषेक शेटे यांनी केलं असून, संकलनाची जबाबदारी चंद्रशेखर गुरव यांनी सांभाळली आहे. सुहास मुंढे आणि समीर पठाण यांनी लिहिलेल्या गीतांना डॉ. जय भीम शिंदे यांचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे. चित्रपटातील गीतं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. श्रेया चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन आणि प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शन केलं आहे.


९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

शाळेतील मैत्री, किशोरवयीन भावविश्व, पालकांचा विरोध आणि गणपतीपुळ्याची सहल अशा विविध पैलूंना एकत्र आणणारा ‘सहल’ चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे शाळेच्या आठवणी पुन्हा जागवणाऱ्या या सहलीचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांना आता ९ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

Web Title: Sahal marathi movie trailer release ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi celebrities
  • marathi movie

संबंधित बातम्या

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?
1

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर
2

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
3

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; पहिल्याच दिवशी विक्रम मोडणार?
4

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; पहिल्याच दिवशी विक्रम मोडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.