Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू ठेवली आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३ टक्क्यांची वाढ झाली असून, दोन दिवसांत निव्वळ कमाई ५७.७५ कोटींवर पोहोचली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 06, 2026 | 12:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दोन दिवसांत ५७.७५ कोटींचा निव्वळ गल्ला
  • हिंदी आवृत्तीची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
  • जुन्या-नव्या पात्रांनी जिंकली प्रेक्षकांची मनं
Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल झालेल्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. प्राइम व्हिडीओवरील लोकप्रिय मालिका ‘मिर्झापूर’चा हा स्पिन-ऑफ पाहण्यासाठी चाहते बऱ्याच काळापासून उत्सुक होते. चित्रपटातील जुन्या-नव्या पात्रांसोबतच दमदार डायलॉग आणि अनेक सीन्सची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३ टक्क्यांची वाढ

‘मिर्झापूर: द मूव्ही’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली. शुक्रवारी चित्रपटाने २५.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल २४.३ टक्क्यांची वाढ झाली.

Sacnilkच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने ३२ कोटी रुपयांची कमाई केली. यातील हिंदी आवृत्तीने तब्बल ३१.७५ कोटी रुपये, तर तेलुगू डब आवृत्तीने सुमारे ०.२५ कोटी रुपये कमावले.

Sonali Kulkarni On Vidyanand Bapat: ”तुझी दमछाक होऊ नये…”; विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर सोनाली कुलकर्णीची कौतुकाची थाप

दोन दिवसांत ५७.७५ कोटींचा निव्वळ गल्ला

दुसऱ्या दिवसाच्या दमदार कमाईनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची भारतातील एकूण निव्वळ कमाई ५७.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर चित्रपटाची भारतातील एकूण सकल कमाई ६९.३० कोटी रुपये झाली आहे.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी झालेली वाढ पाहता आगामी दिवसांमध्येही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी चांगली राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकप्रिय ‘मिर्झापूर’ फ्रँचायझीचा फायदा चित्रपटाला मिळताना दिसत आहे.

जुन्या आणि नव्या पात्रांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये मालिकेतील अनेक लोकप्रिय कलाकार आपल्या जुन्या भूमिकांमध्ये परतले आहेत. पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा कालीन भैय्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अली फजल गुड्डू पंडित आणि दिव्येंदू मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत परतले आहेत.

याशिवाय रसिका दुग्गल बीना त्रिपाठी, तर हर्षिता गौर डिम्पी पंडितच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये श्वेता त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, श्रिया पिळगावकर, शीबा चड्ढा, राजेश तैलंग आणि मोहित मलिक यांचाही समावेश आहे.

The Revolutionaries: प्रेमाच्या सुरांनी सजलं ‘द रिव्होल्युशनरीज’; रोहित सराफ-प्रतिभा रांटाचं ‘माहिया’ गाणं रिलीज

गुरमीत सिंग यांनी केलं दिग्दर्शन

‘मिर्झापूर: द मूव्ही’चं दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केलं आहे, तर चित्रपटाची कथा आणि पटकथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सहनिर्माते आहेत. आता येत्या दिवसांत ‘मिर्झापूर: द मूव्ही’ बॉक्स ऑफिसवर किती मोठा आकडा गाठतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Mirzapur the movie box office collection day 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

Sonali Kulkarni On Vidyanand Bapat: ”तुझी दमछाक होऊ नये…”; विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर सोनाली कुलकर्णीची कौतुकाची थाप
1

Sonali Kulkarni On Vidyanand Bapat: ”तुझी दमछाक होऊ नये…”; विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर सोनाली कुलकर्णीची कौतुकाची थाप

Malaika Arora-Arjun Kapoor: ‘या’ कारणामुळे तुटलं मलायका-अर्जुनचं नातं? ब्रेकअपमागचं कारण चर्चेत
2

Malaika Arora-Arjun Kapoor: ‘या’ कारणामुळे तुटलं मलायका-अर्जुनचं नातं? ब्रेकअपमागचं कारण चर्चेत

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?
3

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?

The Revolutionaries: प्रेमाच्या सुरांनी सजलं ‘द रिव्होल्युशनरीज’; रोहित सराफ-प्रतिभा रांटाचं ‘माहिया’ गाणं रिलीज
4

The Revolutionaries: प्रेमाच्या सुरांनी सजलं ‘द रिव्होल्युशनरीज’; रोहित सराफ-प्रतिभा रांटाचं ‘माहिया’ गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.