Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद

Mirzapur The Movie:बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या प्रमोशनसाठी टीम बुधवारी पुण्यात येणार आहे. टीम चाहत्यांशी संवाद साधणार असून चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 24, 2026 | 03:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mirzapur The Movie:चित्रपटप्रेमींसाठी एक खास बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम या बुधवारी पुणे शहरात दाखल होणार आहे. लोकप्रिय ‘मिर्झापूर’चं विश्व आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

ओटीटीवर आपल्या दमदार कथा, रंजक व्यक्तिरेखा, थरारक घडामोडी आणि गाजलेल्या संवादांमुळे ‘मिर्झापूर’ने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता याच लोकप्रिय विश्वाचा विस्तार ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या माध्यमातून मोठ्या आणि भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पुण्यात चाहत्यांशी साधणार संवाद

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात होणाऱ्या या खास भेटीत ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम चाहत्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे पुण्यातील ‘मिर्झापूर’प्रेमींसाठी ही भेट विशेष ठरणार आहे. टीम पुण्यात येणार असल्याने शहरातील चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर’चं जग किती भव्य स्वरूपात पाहायला मिळणार, याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे या प्रमोशनल दौऱ्याकडे मनोरंजनप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

या कलाकारांची दिसणार झलक?

‘मिर्झापूर’च्या लोकप्रिय व्यक्तिरेखांनी गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता या व्यक्तिरेखांचा मोठ्या पडद्यावरील प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनमुळे त्यांच्यातील उत्साह आणखी वाढणार आहे.

Drishyam The Conclusion: विजय साळगावकर पुन्हा येतोय! ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम

ॲमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चं दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा आणि लेखन पुनीत कृष्णा यांनी केलं आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सह-निर्माते आहेत.

४ सप्टेंबरला ‘मिर्झापूर’ मोठ्या पडद्यावर

पुण्यातील या खास प्रमोशनल भेटीनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’बद्दलचा माहोल आणखी रंगणार आहे. ‘मिर्झापूर’चं लोकप्रिय विश्व आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार असून हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Aditya Seal Anushka Ranjan Twin Baby: आदित्य-अनुष्का झाले आई-बाबा; जुळ्या मुलींच्या आगमनाने घरात दुहेरी आनंद, लेकींची नावंही ठरली

Web Title: Mirzapur the movie team pune promotion wednesday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
1

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर
2

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर

Tejaswini Lonari: लेकाच्या आगमनानंतर तेजस्विनी लोणारीची पहिली पोस्ट चर्चेत; समाधानसोबतच्या खास आठवणी शेअर करत म्हणाली…
3

Tejaswini Lonari: लेकाच्या आगमनानंतर तेजस्विनी लोणारीची पहिली पोस्ट चर्चेत; समाधानसोबतच्या खास आठवणी शेअर करत म्हणाली…

Aasha Singh Jaiswal Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा सिंह जायसवाल काळाच्या पडद्याआड
4

Aasha Singh Jaiswal Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा सिंह जायसवाल काळाच्या पडद्याआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.