Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Miss Universe India 2026: १९ वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया’; टॉप-५मध्ये महाराष्ट्रासह या राज्यांच्या सुंदरी

Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’चा किताब जिंकला. टॉप-५मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तराखंडच्या सुंदरींचा समावेश.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 24, 2026 | 09:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Miss Universe India 2026: ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ या सौंदर्य स्पर्धेचा भव्य अंतिम सोहळा २३ ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये पार पडला. देशभरातून आलेल्या ५३ सौंदर्यवतींमध्ये यंदा चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर केरळची काझिया लिझ मेजो हिने आपल्या नावावर विजेतेपदाची मोहोर उमटवली. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

टॉप-५मध्ये कोणत्या राज्यातील सुंदरी?

यंदाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाच सौंदर्यवतींनी धडक मारली होती. यामध्ये तामिळनाडूची वैष्णवी गणेश, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, केरळची काझिया लिझ मेजो, गुजरातची अनुश्री सातवलेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ यांचा समावेश होता.

अंतिम फेरीत स्पर्धकांसमोर ४० सेकंदांत समारोपाचं भाषण करण्याचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. या फेरीत पाचही अंतिम स्पर्धकांनी भविष्यासाठीची आपली दृष्टी, आयुष्यात आलेली आव्हानं आणि या प्रतिष्ठित मंचापर्यंत पोहोचण्याचा प्रवास याबद्दल मनोगत व्यक्त केलं.

केरळच्या काझिया लिझ मेजोने पटकावला किताब

जयपूरच्या ‘पिंक सिटी’मध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात काझिया लिझ मेजोने आपल्या बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर परीक्षकांची मनं जिंकली. ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२५’ची विजेती मनिका विश्वकर्मा हिने काझियाला विजेतेपदाचा मुकुट प्रदान केला.

निकाल जाहीर झाल्यानंतर केरळच्या काझियाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढला. तामिळनाडूची वैष्णवी गणेश प्रथम उपविजेती, तर गुजरातची अनुश्री सातवलेकर द्वितीय उपविजेती ठरली.

टॉप-५मध्ये महाराष्ट्राची तेजस्विनी

या स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तेजस्विनी श्रीवास्तव हिने केलं. तिने अंतिम पाचमध्ये स्थान मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली. तिच्यासोबत तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि उत्तराखंडच्या सौंदर्यवतींनीही टॉप-५मध्ये आपली जागा निश्चित केली.

आता काझिया करणार भारताचं प्रतिनिधित्व

‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’चा किताब जिंकल्यानंतर काझिया लिझ मेजो आता आंतरराष्ट्रीय ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. या जागतिक मंचावर भारताची विविधता, संस्कृती आणि नव्या पिढीची ताकद जगासमोर मांडण्याची संधी तिला मिळणार आहे.

विजयानंतर काझियाने हा किताब केवळ उपलब्धी नसून मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं. भारताची विविधता, संस्कृती, प्रतिभा आणि नव्या पिढीची शक्ती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं तिने सांगितलं.

Aditya Seal Anushka Ranjan Twin Baby: आदित्य-अनुष्का झाले आई-बाबा; जुळ्या मुलींच्या आगमनाने घरात दुहेरी आनंद, लेकींची नावंही ठरली

सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुणांवर भर

‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’मध्ये केवळ सौंदर्य आणि फॅशनलाच महत्त्व देण्यात आलं नाही. विविध फेऱ्यांमध्ये स्पर्धकांची बुद्धिमत्ता, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि भारतीय संस्कृतीचं आकलन यांचीही परीक्षा घेण्यात आली.

जयपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राजस्थानी संस्कृती आणि आधुनिक भारताचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर, परीक्षक आणि फॅशन तज्ज्ञांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.

Asim Riaz- Himanshi Khurana: असीम रियाजने धर्म परिवर्तनाच्या दाव्यांवर सोडलं मौन; हिमांशी खुराना आणि पारस छाबडावर साधला निशाणा

‘प्रतिभावान मुलींना व्यासपीठ देणं हा उद्देश’

मिस युनिव्हर्स इंडियाचे आयोजक निखिल आनंद यांनी सांगितलं की, देशातील प्रतिभावान मुलींना आपली क्षमता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण जगासमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. याच उद्देशाने यंदाचा सोहळा अधिक मोठ्या आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जयपूरच्या नागरिकांसह स्थानिक प्रशासनाचेही त्यांनी आभार मानले.

Web Title: Miss universe india 2026 winner kaziah liz mejo top 5 states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Miss Universe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.