Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला

Moushumi Chatterjee: मौसमी चॅटर्जी यांनी मुलीला लग्नाबाबत खास सल्ला दिला. ‘बॉयफ्रेंड ठेवता येईल, पण त्याच्याशी लग्न करणं आवश्यक नाही’, असं त्या म्हणाल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 08:32 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Moushumi Chatterjee: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. १९६७ साली प्रदर्शित झालेल्या ‘बालिका वधू’ या बंगाली चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार कारकीर्द घडवली. अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच मौसमी यांचं लहान वयातच प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांचे पुत्र जयंत मुखर्जी यांच्याशी लग्न झालं.

मात्र, स्वतःचं लग्न लहान वयात झाल्यामुळे मौसमी यांनी आपल्या मुलीला लग्नाची घाई न करण्याचा आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा सल्ला दिला आहे.

“बॉयफ्रेंड ठेवता येईल, पण त्याच्याशी लग्न करणं आवश्यक नाही”

जागरण चित्रपट महोत्सव २०२६मध्ये मौसमी चॅटर्जी यांनी मुलीला दिलेल्या सल्ल्याबद्दल भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “मी माझ्या मुलीला सांगते, तुला बॉयफ्रेंड ठेवता येईल, पण त्याच्याशी लग्न करणे आवश्यक नाही.”

भगवद्गीतेचा दाखला देत त्यांनी “बदल हा जगाचा नियम आहे” असं म्हटलं. बदलत्या काळानुसार मुलींनी स्वतःच्या आयुष्याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा त्यांचा सल्ला आहे. यासोबतच त्यांनी आजच्या मुलींनी स्वतःचा विचार करताना थोडं सावध राहण्याची गरज असल्याचंही सांगितलं.

“काळ बदलला आहे, आपण खूप पुढे आलो आहोत”

मौसमी चॅटर्जी यांनी आजच्या काळात मुलगा आणि मुलगी दोघांनाही घरातील जबाबदाऱ्या शिकवण्याची गरज व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आपण मुलींना सासरच्या मंडळींची काळजी घ्यायला शिकवतो; मात्र मुलांना घरकाम शिकवत नाही.

आजची तरुण पिढी अनेक कारणांमुळे तणावाखाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. इतरांना काहीतरी सिद्ध करण्यासाठी स्वतःवर अनावश्यक दबाव आणू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

“तुम्हाला जे आवडतं ते करा, पण अतिरेक करू नका”

मौसमी यांनी तरुणांना आयुष्याचा आनंद घेण्यासोबतच चुका झाल्यास त्यातून शिकण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, “तुम्हाला जे आवडतं ते करा, पण त्याचा अतिरेक करू नका. जर तुमच्याकडून चूक झाली, तर ती पुन्हा करू नका आणि सारासार विचार करा.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे लग्न, नाती आणि स्वतःच्या आयुष्याबाबत तरुण पिढीने स्वतःचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आजारी मावशीच्या इच्छेमुळे अवघ्या महिनाभरात झालं लग्न

मौसमी चॅटर्जी यांनी याआधी आपल्या लग्नाबद्दलचा एक रंजक किस्साही सांगितला होता. ‘बालिका वधू’ चित्रपटाच्या यशानंतर त्यांना लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ लागले होते. त्याच काळात त्यांच्या आजारी मावशीची प्रकृती गंभीर होती.

भवानीपूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मावशीला कॅन्सर झाला होता आणि आजार शेवटच्या टप्प्यात होता. मौसमी यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी मौसमी यांचे होणारे सासरे हेमंत कुमार यांचा हात धरून, आपण मौसमीच्या लग्नाला उपस्थित राहू शकू का, अशी विचारणा केली.

हेमंत कुमार यांनी होकार दिल्यानंतर मौसमी यांचं लग्न अवघ्या एका महिन्यात ठरवण्यात आलं. अशा प्रकारे लहान वयातच त्यांचा विवाह झाला. आज अनेक वर्षांनंतर त्या आपल्या मुलीला मात्र लग्नाची घाई न करण्याचा आणि स्वतःच्या आयुष्याबाबत विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला देताना दिसतात.

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक

Web Title: Moushumi chatterjee daughter marriage advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण
1

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
2

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी
3

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
4

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.