Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adkitta Marathi Movie Review: पालकत्व, विश्वास अन् नात्यांची गुंतागुंत; सई ताम्हणकरचा ‘अडकित्ता’ नेमका कसा आहे?

Adkitta Marathi Movie Review: सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले आणि सई ताम्हणकर यांच्या ‘अडकित्ता’मध्ये पालकत्व, करिअर, विश्वास आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत पाहायला मिळते.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 11, 2026 | 08:30 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • काय आहे ‘अडकित्ता’ची कथा?
  • पालकत्व आणि करिअरमध्ये समतोल साधण्याचं आव्हान
  • आईच्या मनातील ‘गिल्ट’ आणि मुलाला गमावल्याचं दुःख
Adkitta Marathi Movie Review: मराठी मनोरंजनविश्वात कुटुंब, नाती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर अनेक चित्रपट आणि सीरिज पाहायला मिळतात. विशेषतः आजच्या धावपळीच्या आयुष्यात करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना तरुण जोडप्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहतात. याच विषयाला वेगळ्या पद्धतीने हात घालणारा ‘अडकित्ता’ हा मराठी चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे.

‘अडकित्ता’ हे नावही या चित्रपटाला अगदी योग्य आहे. कारण चित्रपटातील पात्रं नाती, जबाबदाऱ्या, विश्वास आणि भावनांच्या अशाच एका गुंतागुंतीत अडकताना दिसतात. ‘मुलाला जन्म देणारी आई मोठी की त्याचं संगोपन करणारी?’ हा प्रश्न चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, त्याचबरोबर आईच्या मनातील अपराधीपणाची भावना, मुलाला गमावल्यानंतरचं दुःख आणि पालकत्वातील भावनिक संघर्षही या कथेतून समोर येतो. हा चित्रपट तीन पात्रांच्या भोवती फिरतो गौतम( सिद्धार्थ चांदेकर) कस्तुरी (सखी गोखले) आणि मंगल( सई ताम्हणकर).

कस्तुरी-गौतमच्या आयुष्यात येतो ओंकार

चित्रपटाची सुरुवात कस्तुरी आणि गौतम या काम करणाऱ्या जोडप्यापासून होते. दोघंही स्वतंत्र विचारांचे, करिअरला महत्त्व देणारे आणि आपल्या शहरापासून दूर राहणारे आहेत. एका पार्टीदरम्यान कस्तुरीला आपण आई होणार असल्याचं समजतं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल सुरू होतो.

गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात कस्तुरीसमोर मोठं संकट उभं राहतं. तिला जुळी मुलं असल्याचं समजतं; मात्र त्यापैकी एका बाळाचा जन्माआधीच मृत्यू होतो. कस्तुरी आणि दुसऱ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर दोघांचे प्राण वाचतात आणि कस्तुरी एका मुलाला जन्म देते. त्याचं नाव ओंकार.

मात्र ओंकारच्या जन्मानंतरच कस्तुरी आणि गौतमच्या आयुष्यातील खरी परीक्षा सुरू होते. करिअर आणि पालकत्व यामध्ये समतोल साधताना त्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. कामाची जबाबदारी सांभाळतानाच बाळाची काळजी घेण्यासाठी त्यांना बाहेरची मदत घ्यावी लागते.

मंगलची एन्ट्री आणि बदलत जातं घर

ओंकारची काळजी घेण्यासाठी मंगल त्यांच्या आयुष्यात येते. सुरुवातीला तिची उपस्थिती कस्तुरी आणि गौतमसाठी मोठा आधार ठरते. मात्र, हळूहळू दोघांचा तिच्यावरचा अवलंब वाढत जातो. ओंकार आणि मंगल यांच्यातही जवळीक निर्माण होते.

इथून चित्रपटाची कथा केवळ पालकत्वापुरती मर्यादित राहत नाही. घरात एखाद्या बाहेरच्या व्यक्तीवर आपण किती विश्वास ठेवावा? तिच्यावर अवलंबून राहण्याची एक सीमा असते का? आणि ती सीमा ओलांडली गेली तर नात्यांमध्ये काय बदल होऊ शकतो? असे प्रश्न चित्रपट पुढे घेऊन जातो.

मंगलच्या व्यक्तिमत्त्वात दिसतं त्यापेक्षा बरंच काही दडलं आहे, ही गोष्ट या कथेला वेगळं बनवते. तिच्या आयुष्यातील एक मोठी दुःखद घटना तिच्या स्वभावाला आणखी एक वेगळी बाजू देते. मुलाला गमावल्यानंतर ती कोलमडते, तिचा पतीही तिला सोडून जातो. मात्र या सगळ्यानंतर ती स्वतःला सावरते आणि पुन्हा आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करते.

आईच्या मनातील ‘गिल्ट’ आणि दुःखाला दिलेला स्पर्श

‘अडकित्ता’ची एक महत्त्वाची बाजू म्हणजे आईच्या भावनांचं चित्रण. नुकतीच आई झालेल्या स्त्रीच्या मनात निर्माण होणारं अपराधीपण असो किंवा आपल्या मुलाला गमावल्यानंतर एका आईला सहन करावं लागणारं दुःख असो, चित्रपट या भावनांकडे गांभीर्याने पाहतो.

मंगल आणि कस्तुरी या दोन स्त्रियांच्या आयुष्यातील परिस्थिती वेगवेगळी असली तरी दोघीही मातृत्वाच्या भावनांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे ओंकारसोबत मंगलची वाढती जवळीक कस्तुरीला अस्वस्थ करते. तिच्या मनात निर्माण होणारी असुरक्षितता आणि मंगलशी असलेलं नातं या सगळ्यामुळे घरातील वातावरण बदलत जातं.

दिग्दर्शन आणि कथा

‘अडकित्ता’चं दिग्दर्शन आशुतोष निखिल परंधकर यांनी केलं असून, दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात मोठे चढ-उतार किंवा सतत धक्के देणारे प्रसंग नाहीत. तरीही कथा हळूहळू पुढे जाताना प्रेक्षकांना गुंतवून ठेवते.

सई ताम्हणकरची मंगल लक्षात राहते

सई ताम्हणकरने मंगलची भूमिका साकारली आहे. पैशांची गरज असलेली, मनाने दयाळू आणि संवेदनशील स्त्री अशी तिची व्यक्तिरेखा आहे. आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागूनही ती आपला माणुसकीचा स्वभाव गमावत नाही.

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष

सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखलेचा अभिनय

सिद्धार्थ चांदेकरची पडद्यावरील उपस्थिती नेहमीच सहज आणि आपलीशी वाटते. ‘अडकित्ता’मध्ये त्याने पत्नीला साथ देणारा, स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास ठेवणारा आणि बाळाच्या जन्मानंतर कुटुंबात समतोल राखण्याचा प्रयत्न करणारा गौतम साकारला आहे.

सखी गोखलेने कस्तुरीच्या व्यक्तिरेखेतून नव्या आईच्या मनातील अनेक भावना समोर आणल्या आहेत. आई झाल्यानंतर करिअर, मुलाची जबाबदारी आणि घरातील बदल यांचा ताण तिच्या व्यक्तिरेखेतून जाणवतो. सई ताम्हणकर आणि सखी गोखले यांच्या व्यक्तिरेखा दोन वेगवेगळ्या मातांच्या भावविश्वाकडे पाहण्याची संधी देतात.

संगीतही कथेला साथ देतं

‘अडकित्ता’मध्ये संगीताचाही चांगला वापर करण्यात आला आहे. चित्रपटातील गाणी नायकांच्या भावना आणि कथेतला काळ दाखवण्यास मदत करतात. गाणी शांत आणि भावपूर्ण आहेत.

विश्वासाचा प्रश्न आणि शेवटचा ट्विस्ट

कस्तुरी आणि गौतम एका बातमीनंतर मंगलवर लक्ष ठेवण्यासाठी घरात CCTV लावण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर गौतम जवळपास महिनाभर मंगलकडे लक्ष ठेवतो. इथून मात्र एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो—आपण ज्या व्यक्तीवर आपल्या मुलाची जबाबदारी सोपवली आहे, तिच्यावर आपला विश्वास उरलेला नाही का?

चित्रपट जसजसा शेवटाकडे जातो, तसतशी या नात्यांची गुंतागुंत वाढत जाते. शेवटच्या भागात काहीतरी वेगळं घडतं आणि कथा ज्या दिशेने जाणार असं वाटतं, त्यापेक्षा वेगळं वळण घेते. हा ट्विस्ट सांगणं योग्य ठरणार नाही; तो अनुभवण्यासाठी चित्रपट पाहणं महत्त्वाचं आहे.

Baahubali: ‘बाहुबली’ युनिव्हर्सचा ग्लोबल विस्तार; ड्रीम थिएटरसोबत मोठी पार्टनरशिप

‘अडकित्ता’ पाहावा का?

खरं सांगायचं तर ‘अडकित्ता’ प्रत्येक प्रेक्षकाला आवडेलच असं नाही. हा मोठ्या प्रमाणावर मनोरंजन किंवा सतत थरार देणारा चित्रपट नाही. मात्र मानवी भावना, मातृत्व, आईच्या मनातील अपराधीपणाची भावना, मुलाला गमावल्यानंतरचं दुःख, विश्वास आणि नात्यांमधील असुरक्षितता या विषयांकडे प्रामाणिकपणे पाहणारा हा चित्रपट आहे.मोठे ट्विस्ट आणि अतिनाट्य टाळून मानवी नात्यांमधील भावना मांडणारी वेगळी कथा पाहायची असेल, तर ‘अडकित्ता’ला एक संधी देता येईल.

Web Title: Adkitta marathi movie review sai tamhankar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Raj Hanchanale: कन्यारत्न! ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे झाला बाबा; पत्नीच्या वेदना पाहून म्हणाला, ‘तिच्या जागी मी…’
1

Raj Hanchanale: कन्यारत्न! ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे झाला बाबा; पत्नीच्या वेदना पाहून म्हणाला, ‘तिच्या जागी मी…’

Maitreya Movie:  मैत्रीचं प्रेमात रूपांतर! ‘मैत्रेया’मधील ‘तुला पाहते’ हे रोमँटिक गाणं रिलीज
2

Maitreya Movie: मैत्रीचं प्रेमात रूपांतर! ‘मैत्रेया’मधील ‘तुला पाहते’ हे रोमँटिक गाणं रिलीज

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत
3

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत

Gondhal Marathi Movie: भारताची ऑस्कर एंट्री ठरलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही आली समोर
4

Gondhal Marathi Movie: भारताची ऑस्कर एंट्री ठरलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.