Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Mrityu Chakra Movie: पुष्कराज चिरपुटकर आगामी मराठी चित्रपट ‘मृत्यूचक्र’मध्ये ‘गुरु’च्या भूमिकेत दिसणार आहे. रहस्य आणि थराराने भरलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 26, 2026 | 04:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mrityu Chakra Movie: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि बहुआयामी अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आता आगामी मराठी चित्रपट ‘मृत्यूचक्र’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या पुष्कराजची या चित्रपटातील व्यक्तिरेखा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

श्रीमहादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी केले आहे.

‘गुरु’च्या भूमिकेत दिसणार पुष्कराज

‘मृत्यूचक्र’ हा रहस्य आणि थराराने भरलेला चित्रपट आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा कथानकाला वेगळी दिशा देणारी असल्याचे सांगितले जात आहे. अशाच रहस्यमय वातावरणात पुष्कराज चिरपुटकर ‘गुरु’ या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

मात्र, ‘गुरु’ नेमका कोण आहे? कथानकात त्याची भूमिका काय आहे? त्याचा इतर व्यक्तिरेखांशी नेमका काय संबंध आहे? या प्रश्नांची उत्तरे सध्या निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे पुष्कराजच्या या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Raksha Bandhan 2026: राखीच्या धाग्यापलीकडचं नातं! झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या भावंडांसोबतच्या खास आठवणी

नव्या अंदाजात दिसणार अभिनेता

पुष्कराज चिरपुटकरने आजवर विनोदी तसेच गंभीर अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयातील सहजता आणि व्यक्तिरेखेत शिरण्याची पद्धत प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे. त्यामुळे ‘मृत्यूचक्र’मध्ये तो नेमक्या कोणत्या अंदाजात दिसणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

चित्रपटाच्या शीर्षकापासून ते व्यक्तिरेखांपर्यंत अनेक गोष्टी रहस्याच्या आवरणात ठेवण्यात आल्या आहेत. ‘गुरु’च्या व्यक्तिरेखेची पहिली झलक समोर आल्यानंतर या व्यक्तिरेखेभोवतीचे गूढ आणखी वाढले आहे.

‘गुरु’चे रहस्य कधी उलगडणार?

‘मृत्यूचक्र’मध्ये पुष्कराज चिरपुटकरचा ‘गुरु’ नेमका कोण आहे आणि कथानकात त्याची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळणार आहे. त्यामुळे रहस्य आणि थराराने भरलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: वादानंतर क्रिती सेननची रक्षाबंधन जाहिरात हटवली; कपड्यांवरून झाला होता मोठा वाद

Web Title: Mrityu chakra movie pushkaraj chirputkar guru role mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
4

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.