Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर असताना अनर्थ! पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ

Salman Khan House: मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा ड्युटीवर असतानाच अचानक मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते खाली कोसळले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 08, 2026 | 01:30 PM
Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा मृत्यू.
  • ड्युटीवर असताना अचानक प्रकृती बिघडून ते खाली कोसळले.
  • प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज; घटनेने पोलिस दलात शोककळा.
Police Constable Dies on Duty Outside Of Salman Khan Galaxy Apartment: मुंबईतून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला. ड्युटीवर असतानाच त्यांची तब्येत बिघडली आणि काही वेळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पोलिस दलात आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रायते हे गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारीही ते आपले काम करत होते. संध्याकाळच्या सुमारास अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला प्रकृतीत बिघाड जाणवत असल्याचे दिसून आले; मात्र काही क्षणांतच परिस्थिती गंभीर झाली आणि ते जमिनीवर कोसळले.

गणेश रायते अचानक खाली पडल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. वेळ न घालवता त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला.(Salman Khan House:)

अवघ्या ४१व्या वर्षी अंत

गणेश रायते यांचे वय केवळ ४१ वर्षे होते. कामाच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने ही घटना अधिकच दुःखद ठरली आहे. कुटुंबासाठीही हा धक्का अत्यंत मोठा आहे. घरातील व्यक्ती अचानक कायमची निघून गेल्याने रायते यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर परिचित आणि सहकाऱ्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेक दिवसांपासून सुरक्षेची जबाबदारी

सलमान खानच्या घराबाहेर नेहमीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. विशेषतः अभिनेत्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिस कर्मचारी परिसरात सतत तैनात असतात. त्याच व्यवस्थेचा भाग म्हणून गणेश रायते आपली जबाबदारी पार पाडत होते. ऊन, पाऊस किंवा इतर कोणतीही परिस्थिती असो, ड्युटीवर असताना सुरक्षेची जबाबदारी सांभाळणे हे त्यांचे नियमित काम होते.

गॅलेक्सी अपार्टमेंट चर्चेत का असते?

सलमान खानचे गॅलेक्सी अपार्टमेंट मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. वांद्रे पश्चिम भागात, बँडस्टँडच्या परिसरात ही इमारत आहे. सलमान खान आपल्या कुटुंबासह याच ठिकाणी राहतो. त्यामुळे या इमारतीबाहेर नेहमीच चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांचाही बंदोबस्त असतो.

Jugal Hansraj: ‘लकडी की काठी’चा तो चिमुकला चेहरा आठवतोय? ४३ वर्षांनी करतोय ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक

गणेश रायते यांच्या कुंटुबावर दुखाचा डोंगर

गणेश रायते यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. रोज कर्तव्यावर जाणारी व्यक्ती पुन्हा घरी परतणार नाही, ही कल्पनाच कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अधिकृत तपासणीनंतर स्पष्ट होणार असले, तरी प्राथमिक माहितीत हृदयविकाराचा झटका कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

कर्तव्य बजावताना गमावला जीव

पोलिसांचे काम अनेकदा धावपळीचे आणि जबाबदारीचे असते. नागरिकांची सुरक्षा आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करताना त्यांना सतत सतर्क राहावे लागते. गणेश रायते हे देखील आपली जबाबदारी पार पाडत असतानाच जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलिस दलातील सहकाऱ्यांसह अनेकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.

Web Title: Mumbai police constable dies on duty outside of salman khan galaxy apartment know about what exactly happens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Mumbai Police news
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
1

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक
2

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग
3

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
4

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.