Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar Funeral: चाहत्यांना अश्रू अनावर; नाना पाटेकरांवर कुठे होणार अंत्यसंस्कार? माहिती समोर आली

Nana Patekar Funeral: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. गोव्यातून त्यांचे पार्थिव पुण्यात आणले जाणार असून पुण्यातच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 08, 2026 | 10:28 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नाना पाटेकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • ‘नानाची वाडी’त होणार नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार
  • मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मोठी हानी
Nana Patekar Funeral: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी सुमारे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या अंत्यसंस्काराबाबतही माहिती समोर आली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने आणि अष्टपैलू भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नाना पाटेकर यांना आता शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाणार आहे. नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली आहे.

‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या शेतातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.

‘नानाची वाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच फार्महाऊसमध्ये नाना पाटेकर अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहत होते. नाना पाटेकर यांचे या ठिकाणाशी विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

Nana Patekar Passed Away: मैत्रीला सलाम! अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यासाठी धावले होते नाना पाटेकर, जाणून घ्या रंजक किस्सा

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही शोक व्यक्त केला आहे. नाना पाटेकर हे आपले जवळचे मित्र होते, असे त्यांनी सांगितले.

“नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले, याचे मला खूप दु:ख होत आहे. ते माझे चांगले मित्र होते. गोव्यात आले की ते माझ्या घरी यायचे,” अशी आठवण प्रमोद सावंत यांनी सांगितली.

नाना पाटेकर यांच्यासोबत झालेल्या भेटींच्या आठवणी सांगताना सावंत यांनी पुढे म्हटले की, नाना भेटले की त्यांच्यासोबत नेहमी शेतकऱ्यांबद्दल चर्चा व्हायची. “मी माझा जवळचा मित्र गमावला आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण

Web Title: Nana patekar funeral last rites pune nanachi wadi ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • entertainment
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
1

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
2

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट
3

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं
4

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.