(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Navratri Special Look: नवरात्रौत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वत्र नवरात्रीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नवरात्री म्हटलं की गरबा, रास-दांडिया आणि रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख यांची खास उत्सुकता असते. देशभरातच नव्हे तर जगभरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अशावेळी प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांत नेमका कोणता लूक करायचा?
तुम्हालाही गरबा नाईटमध्ये इतरांपेक्षा वेगळं आणि स्टायलिश दिसायचं असेल, तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनमधून प्रेरणा घेऊ शकता. सोनम कपूरपासून अनन्या पांडे आणि आलिया भट्टपर्यंत या अभिनेत्रींचे काही लूक्स नवरात्रीसाठी परफेक्ट फॅशन गोल्स देतात.
नवरात्रीसाठी पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधायचा असेल, तर इंडो-फ्युजन लूक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सोनम कपूरने पुनीत बलानाचा परिधान केलेला पोशाख यासाठी उत्तम प्रेरणा ठरू शकतो.
कॉलर असलेला कुर्ता आणि इंडो-फ्युजन शरारा सेट असा लूक तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये पारंपरिक पोशाखाला मॉडर्न टच मिळतो. गरबा किंवा दांडियाच्या कार्यक्रमासाठी हा लूक स्टायलिश दिसण्यासोबतच आरामदायकही ठरू शकतो.
नवरात्रीसाठी नेहमीचा पारंपरिक ब्लाउज न घालता काहीतरी हटके ट्राय करायचं असेल, तर अनन्या पांडेच्या लूकमधून प्रेरणा घेऊ शकता. यासाठी तुम्हाला खास तयारी करण्याची गरज नाही.
तुमच्याकडे असलेला आवडता ट्यूब टॉप आणि आईच्या कपाटातील भरगच्च नक्षीकाम असलेली साडी निवडा. यासोबत गळ्यात पारंपरिक चोकर घाला. केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा माळल्यास या लूकला आणखी सुंदर पारंपरिक टच मिळेल. सिंपल असूनही हा लूक नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेईल.
नवरात्रीच्या गर्दीत वेगळं आणि खास दिसायचं असेल, तर ब्लाउजच्या बाबतीत प्रयोग करणं गरजेचं आहे. आलिया भट्टने परिधान केलेला नाजूक चायनीज-कट ब्लाउज यासाठी उत्तम फॅशन इन्स्पिरेशन ठरू शकतो.
साडी हलकी आणि नाजूक असेल, तर आकर्षक ब्लाउजमुळे संपूर्ण लूकला वजनदार आणि प्रभावी टच मिळतो. त्यामुळे साडी साधी ठेवून ब्लाउजच्या डिझाइनवर अधिक भर देता येईल.
शिफॉन साडी आणि मिनिमल ब्लाउजचा क्लासी लूक
तुम्हाला थोडा अधिक मॉडर्न आणि एलिगंट लूक हवा असेल, तर शिफॉनची साडी हा पर्याय नक्की ट्राय करा. साडी पारंपरिक पद्धतीने नेसून त्यावर त्याच रंगाचा साधा आणि मिनिमल ब्लाउज परिधान करू शकता.
ब्लाउज आकर्षक असेल, तर साधी साडीही उठून दिसते. मिसमॅचिंग ब्लाउजमुळे कॉन्ट्रास्ट तयार होतोच; मात्र साडी आणि ब्लाउजचा मोनोक्रोमॅटिक लूकही तितकाच क्लासी दिसू शकतो.
View this post on Instagram
Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
नऊवारी साडीपासून तयार करा हटके लेहेंगा लूक
नऊवारी साडीच्या चुण्यांना कायम ठेवून त्यातून लेहेंगा लूक तयार करण्याची कल्पनाही तुम्ही ट्राय करू शकता. या लूकसाठी आलिया भट्टच्या स्टाइलमधून प्रेरणा घेता येईल.
या पोशाखासोबत भरजरी दागिने घातल्यास संपूर्ण लूक आणखी उठून दिसेल. केस मोकळे ठेवून लूकला थोडा ग्लॅमरस टच देता येईल. गरबा नाईटसाठी पारंपरिक पोशाखाला मॉडर्न ट्विस्ट देण्याचा हा हटके पर्याय ठरू शकतो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी वेगळा लूक करण्याचा विचार करत असाल, तर सेलिब्रिटींच्या या स्टाइलिंग टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. पारंपरिक पोशाखांसोबत थोडे मॉडर्न प्रयोग करून तुम्ही गरबा नाईटमध्ये स्वतःचा वेगळा स्टाइल स्टेटमेंट तयार करू शकता.






