( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Netflix Top 5 Movies: नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी या यादीत स्थान मिळवलं असून, प्रेक्षकांमध्येही या सिनेमांची जोरदार चर्चा सुरू आहे. सस्पेन्स, ड्रामा, कॉमेडी आणि अॅक्शनने भरलेले हे चित्रपट सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. तुम्हीही ओटीटीवर नवीन सिनेमांच्या शोधात असाल, तर हे पाच चित्रपट तुमच्या बिंज-वॉच लिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करू शकता.
सूर्या स्टारर हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवरही या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. सूर्यासोबत ममिता बैजू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
चित्रपटात कॉमेडी, कौटुंबिक ड्रामा आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळतो. या सिनेमाला IMDb वर 7.4 रेटिंग मिळाली आहे.
आर. माधवनच्या चित्रपटानेही नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. भारतीय संशोधक आणि आविष्कारक जी.डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आर. माधवन यांनी त्यांची भूमिका साकारली आहे.
थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवता आलं नसलं, तरी ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये हा सिनेमा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अजय देवगण स्टारर ‘धमाल 4’नेही या ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. कॉमेडीने भरलेला हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटीवरही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अजय देवगणसोबत रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी आणि रवी किशन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
तापसी पन्नू स्टारर ‘गांधारी’देखील नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये चर्चेत आहे. सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेल्या या सिनेमात तापसीने एका नेत्रहीन महिलेची भूमिका साकारली आहे.
चित्रपटातील कथा आणि सतत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत ‘गांधारी’ चौथ्या क्रमांकावर आहे. तापसीसोबत स्वास्तिका मुखर्जी, छाया कदम, प्रशांत नारायणन आणि चंदन रॉय यांच्या भूमिका आहेत.
अभिनेता वरुण तेज स्टारर चित्रपटानेही नेटफ्लिक्सच्या टॉप ५ ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
सस्पेन्ससोबतच कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात वरुण तेजसोबत रितिका नायक, सत्य, सुनील आणि श्रीनिवास अवसराला महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील मनोरंजक प्रसंगांनाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.
नेटफ्लिक्सच्या या ट्रेंडिंग लिस्टवरून सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे.






