लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा
सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. अखेर सरकारकडून सप्टेंबर महिन्याची रक्कम वितरित करण्यात आली. या योजनेची घोषणा करताना पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पुढे ही रक्कम २१०० रुपये करण्याचेही सरकारने सांगितले होते. मात्र, सध्या महिलांना १५०० रुपयेच मिळत आहेत. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय फायदा झाल्याचे मानले जाते. मात्र, योजनेच्या खर्चामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू
दरम्यान, योजना बंद होणार असल्याच्या चर्चेनंतर सरकारने योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पात्र महिलांनी आपली माहिती आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्यात राबवली जाते?
ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवली जाते.
२. या योजनेअंतर्गत महिलांना किती आर्थिक मदत मिळते?
पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात.
३. कोणत्या महिन्याचा हप्ता जमा झाला आहे?
सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.






