Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट

OTT Release: ४ सप्टेंबरच्या वीकेंडला OTTवर नवे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. Netflix, JioHotstar, Amazon Prime Video, SonyLIVसह विविध प्लॅटफॉर्मवरील संपूर्ण लिस्ट पाहा.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 03, 2026 | 09:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ४ सप्टेंबरचा OTT वीकेंड असणार मनोरंजक
  • ‘मिर्झापूर द मूव्ही’ ते ‘जीवन या भीमा कौन?’
  • Netflix, JioHotstar आणि इतर प्लॅटफॉर्मवरील रिलीजची संपूर्ण लिस्ट
OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात OTT प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. Netflix, JioHotstar, Amazon Prime Video, SonyLIV यांसह विविध प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. यामध्ये कॉमेडी, थ्रिलर, कोर्टरूम ड्रामा, अॅक्शन आणि रोमँटिक कथांचा समावेश आहे. जाणून घ्या चित्रपट आणि वेब सिरीजची लिस्ट
जाणून घेऊया या आठवड्यातील रिलीजची संपूर्ण लिस्ट.

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट
१. ‘मिर्झापूर द मूव्ही’

OTTवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘मिर्झापूर’ फ्रँचायझीचा आता मोठ्या पडद्यावर विस्तार होत आहे. ‘मिर्झापूर द मूव्ही’मध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्या यांच्या वर्चस्वाच्या लढाईची पुढची कहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामुळे ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

२. ‘हाउ टू रॉब ए बँक’

‘How to Rob a Bank’ हा अॅक्शन-ड्रामा थरार आणि मोठ्या जोखमीच्या दरोड्यांनी भरलेला आहे. रोमांचक घटनांनी भरलेली ही कथा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

३. ‘जीवन या भीमा कौन?’

हास्य आणि हलक्याफुलक्या मनोरंजनाने भरलेला ‘जीवन या भीमा कौन?’ हा विनोदी चित्रपटही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अर्शद वारसी दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

OTT प्लॅटफॉर्मवर नवं मनोरंजन

१. ‘जगमे संगीतम्’ – Amazon Prime Video

‘जगमे संगीतम्’ हा तेलुगू म्युझिकल ड्रामा आहे. ‘बंदिश बँडिट्स’पासून प्रेरित असलेल्या या कथेत शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेला बालू आणि पॉप गायिका पल्लवी यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. परंपरा, महत्त्वाकांक्षा आणि कौटुंबिक रहस्ये यांच्यातील संघर्ष या कथेत पाहायला मिळेल.

२. ‘धमाल ४’ – Netflix

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ‘धमाल ४’ आता OTTवर येत आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या कॉमेडी चित्रपटाचा आनंद आता घरबसल्या घेता येणार आहे.

३. ‘मेडे’ – Apple TV

‘मेडे’ या अॅक्शनपटाची कथा १९८७ सालच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका अमेरिकन पायलटचं विमान सोव्हिएत प्रदेशात कोसळतं. त्यानंतर एक माजी KGB एजंट त्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे येतो. रायन रेनॉल्ड्स आणि केनेथ ब्रॅनाघ यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

४. ‘द कोर्ट’ – JioHotstar

‘द कोर्ट’ हा तमिळ कोर्टरूम ड्रामा आहे. या कथेत याझिनी नावाची तरुण वकील एका हाय-प्रोफाईल खटल्यात आपल्या अनुभवी वडिलांसमोर उभी ठाकते. बोलण्यात अडचण असूनही ती न्यायालयात आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करते.

५. ‘उन्मधम’ – SonyLIV

‘उन्मधम’मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची कथा पाहायला मिळते. आपल्या आगामी स्क्रिप्टसाठी प्रेरणा मिळवण्याच्या उद्देशाने तो एका जुन्या कोल्ड केसचा पुन्हा तपास सुरू करतो. तपास जसजसा पुढे जातो, तसतसा वास्तव आणि कल्पनारम्यतेमधील फरक धूसर होत जातो. या कथेत कुंचाको बोबन प्रमुख भूमिकेत आहेत.

६. ‘अर्ल मीट्स वर्ल्ड’ – Netflix

‘अर्ल मीट्स वर्ल्ड’ ही आठ भागांची डॉक्यु-सिरीज आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ॲलिक्स अर्लचं व्यावसायिक साम्राज्य, वैयक्तिक आयुष्य, हाय-प्रोफाईल ब्रेकअप आणि त्यानंतर झालेल्या चर्चांचा या सीरिजमध्ये आढावा घेण्यात आला आहे.

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित

एकूणच, या आठवड्यात चित्रपटगृह आणि OTT अशा दोन्ही ठिकाणी मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वीकेंड घरबसल्या घालवायचा असेल किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल, प्रेक्षकांसमोर अनेक पर्याय असणार आहेत.

दोन मित्र, एक धोकादायक मिशन आणि भरपूर धमाल; VIBE चा Trailer Out! Kunal Khemu च्या ॲक्शन-कॉमेडीचा धमाका

Web Title: Ott release september 4 2026 movies web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • OTT

संबंधित बातम्या

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय
1

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट
2

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा
3

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज
4

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.