Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दत्तभक्तीचा सुरेल सोहळा! १२ वर्षांनंतर पं. अजित कडकडे यांचं पुनरागमन; ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भक्तिगीत प्रदर्शित

Shripada Vallabha Digambara: पंडित अजित कडकडे यांच्या भावस्पर्शी आवाजातील 'श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हे नवीन भक्तिगीत सप्तसूर म्युझिकवर प्रदर्शित झाले आहे. तब्बल १२ वर्षांनंतर त्यांनी अल्बम सॉंगमधून पुनरागमन केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 12:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shripada Vallabha Digambara: दत्तभक्तांच्या श्रद्धेला आणि भक्तीभावाला सुरांची जोड देणारं ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे नवीन भक्तिगीत नुकतंच सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ वर्षांनंतर ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे यांनी अल्बम सॉंगमधून पुनरागमन केलं असून त्यांच्या भावस्पर्शी आवाजामुळे हे गीत अधिकच भक्तिमय झालं आहे.

“कृतार्थ झाला जन्म पाहुनी सगुण रूप साकार, दत्त दत्त स्मरता तरला ब्रह्मांडाचा भार” या ओळींमधून दत्तगुरूंच्या कृपेचा, त्यांच्या सगुण स्वरूपाचा आणि भक्तीच्या अनुभूतीचा प्रभावी आविष्कार या गीतात करण्यात आला आहे.

या भक्तिगीताची निर्मिती सप्तसूर म्युझिकने केली असून साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष हे निर्माते आहेत. गीताचे बोल साई दळवी यांनी लिहिले असून संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. संगीत संयोजन निषाद गोलांबरे यांनी केले आहे. तबल्यावर शुभम सुतार, पखवाजावर तेजस मोरे यांनी साथ दिली असून मयुरेश, गीता गोलांबरे आणि बीना राजाध्यक्ष यांच्या कोरसने गीत अधिक भक्तिरसपूर्ण बनले आहे.

दत्तगुरू हे श्रद्धा, ज्ञान, संयम आणि करुणेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या नामस्मरणाने मनःशांती आणि आत्मिक समाधान मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हीच भावना ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या गीतातून प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे.

पंडित अजित कडकडे यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण गायकीमुळे या गीताला वेगळीच उंची मिळाली आहे. त्यांच्या आवाजातील भक्तिभाव प्रत्येक श्रोत्याच्या मनाला स्पर्श करत दत्तभक्तीचा दिव्य अनुभव देतो.

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

यावेळी निर्माते साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी सांगितले की, “सप्तसूर म्युझिक नेहमीच दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण संगीत रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. भक्तिगीते, भावगीते आणि मराठी संगीताच्या विविध प्रकारांतून श्रोत्यांना दर्जेदार कलाकृती देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”

दत्तभक्तांसाठी तसेच संगीतप्रेमींसाठी ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे गीत भक्ती, श्रद्धा आणि सुरांची सुंदर मेजवानी ठरणार आहे.

Katrina Kaif Birthday: खरं नाव, ६ बहिणी आणि कोट्यवधींचा बिझनेस; कतरिना कैफबद्दलच्या ‘या’ ७ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Web Title: Pandit ajit kadkade returns after 12 years with the devotional song shripad vallabh digambara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित
1

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित

‘सासूबाईंनी आणि तिने माझी..’, जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईचा व्हिडिओ चर्चेत, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
2

‘सासूबाईंनी आणि तिने माझी..’, जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईचा व्हिडिओ चर्चेत, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना
3

२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीचे थाटात पार पडलं डोहाळेजेवण, लग्नानंतर २ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई
4

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीचे थाटात पार पडलं डोहाळेजेवण, लग्नानंतर २ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.