Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीचे थाटात पार पडलं डोहाळेजेवण, लग्नानंतर २ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे लवकरच आई होणार आहे. नुकतेच तिचे मराठमोळ्या पद्धतीने डोहाळेजेवण पार पडले. पती सिद्धार्थ राऊतसोबतचा भावनिक व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने व्यक्त केल्या खास भावना.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 03:49 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री स्वरदा ठिगळे लवकरच होणार आई
  • अभिनेत्रीचे थाटात पार पडलं डोहाळेजेवण
  • डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Swarada Thigale:  मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘माझे मन तुझे झाले’ आणि ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्वरदा लवकरच आई होणार आहे. नुकतच स्वरदाचे डोहाळेजेवण मोठ्या थाटात पार पडले. तिने सोशल मीडियावर तिच्या डोहाळेजेवणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काहीदिवसांपूर्वी तिच्या चोर ओटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. स्वरदाने अलिकडेच नवऱ्यासोबत खास फोटोशूट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. लवकरच अभिनेत्रीच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणार असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

स्वरदा ठिगळेने 2024 मध्ये सिद्धार्थ राऊतशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 2 वर्षांनंतर अभिनेत्री आई होणार आहे. नुकताच अभिनेत्रीच्या घरी मराठमोळ्या पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. हा व्हिडिओ पोस्ट करताना स्वरदाने लिहिले, एक वर्षापूर्वी मी कधीच कल्पना केली नव्हती की, माझ्या पोटात वाढणाऱ्या या छोट्याशा जीवासाठी मी इतक्या प्रेमाने ‘डोहाळ जेवण’ सोहळ्याची तयारी करत असेन. आज आरशात मला फक्त माझा बेबी बंप दिसत नाही… दिसतंय ते आई होण्याचं सुंदर स्वप्न, कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद, छोट्याशा हातांची ऊब, असंख्य जागरणं, निरागस हास्य आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवाव्याशा वाटणाऱ्या अनमोल आठवणी.”

यानंतर अभिनेत्रीने पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “माझं मन आनंदाने भरून आलं आहे. माझं संपूर्ण कुटुंब या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. आणि माझ्या बाळा… आम्ही तुला भेटण्याचे दिवस मोजत आहोत. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आशीर्वादाचा छोटासा उत्सव आहे.”

या भावनिक पोस्टसोबत अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचा एक खास व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही ‘डोहाळ जेवण’ सोहळ्यातील आनंदाचे क्षण साजरे करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून, लवकरच आई-बाबा होणाऱ्या या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Tejashri Pradhan New Car: लक्झरी कारची मालकीण झाली तेजश्री प्रधान; नव्या मर्सिडीजची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर

दरम्यान, घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच अभिनेत्रीच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असून, प्रत्येकजण या खास क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.

डोहाळे जेवणाच्या सोहळ्यासाठी स्वरदा ठिगळे हिने पारंपरिक हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती, तर तिच्या पतीने कुर्ता-पायजमा असा साधा आणि आकर्षक लूक केला होता. दोघांचा हा व्हिडिओ अतिशय गोड आणि भावनिक असून, ते प्रेमाने स्वरदाच्या बेबी बंपकडे पाहताना आणि आपल्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

 

Marathi Serial : झी मराठीच्या ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये अनुष्का पिंपुटकरची एन्ट्री; ‘जिगिशा’बद्दल सांगितल्या ‘या’ खास गोष्टी

स्वरदाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “खूप सुंदर”, “देव आशीर्वाद देवो”, “लवकरच गोंडस बाळाचं स्वागत होवो” अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

Web Title: Premachi goshta fame actress swarda thigale celebrates a grand baby shower actress to embrace motherhood two years after marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
1

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत
2

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
3

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा
4

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.