Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आधुनिक काळाशी जोडणाऱ्या 'समर्थ' मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. भूषण प्रधान, हार्दिक जोशी, पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 11:32 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक काळाशी जोडणारा ‘समर्थ’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातील भावस्पर्शी मांडणी आणि प्रभावी दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेले वडील आणि आधुनिक विचारांनी प्रेरित झालेला मुलगा यांच्यातील मतभेद कथेला वेगळं वळण देतात. या संघर्षातून समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीची जीवनातली उपयुक्तता अधोरेखित करण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.

वडील आणि मुलामधील तणाव दूर होईल का? समर्थांच्या विचारांमुळे या कुटुंबाला नवी दिशा मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळणार आहेत.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणाले, “‘समर्थ’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर आजच्या पिढीसमोरील प्रश्नांची उत्तरं समर्थ रामदास स्वामींच्या विचारांतून शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक कुटुंबाला जवळची वाटेल.”

निर्माते रविंद्र पाठक यांनी सांगितले, “‘समर्थ’ हा चित्रपट दोन पिढ्यांमधील हरवलेला संवाद पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्म, नाती आणि जीवनमूल्यांचा समतोल मांडणारी ही कथा प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडेल.”

 

Shehnaaz Gill On Raghav Juyal : राघव जुईयलसोबतच्या नात्यावर शहनाज गिलची पहिली प्रतिक्रिया; डेटिंगच्या चर्चांवर दिलं स्पष्ट उत्तर

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात कोणते कोणते कलाकार?

या चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

आध्यात्मिक विचार आणि आधुनिक जीवनातील वास्तव यांची सांगड घालणारा ‘समर्थ’ हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही, तर आत्मपरीक्षणाची संधीही देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

Web Title: Samarth teaser out upcoming marathi film brings samarth ramdas swamis inspirational teachings to the modern era

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Bhushan Pradhan
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘स्वप्नसुंदरी’साठी हटके प्रमोशन! ‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत चाहत्यांच्या लग्नात पोहोचले भूषण प्रधान-सायली पाटील
1

‘स्वप्नसुंदरी’साठी हटके प्रमोशन! ‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत चाहत्यांच्या लग्नात पोहोचले भूषण प्रधान-सायली पाटील

Indrajaal Movie Trailer : सत्य की भ्रम? रहस्याचा पडदा उघडणार, ‘इंद्रजाल’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
2

Indrajaal Movie Trailer : सत्य की भ्रम? रहस्याचा पडदा उघडणार, ‘इंद्रजाल’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Nikhil Rajeshirke : लक्ष्मी निवास’ फेम निखिल राजेशिर्केच्या मुलाचं बारसं; नावाचा खास अर्थही केला शेअर, बारशाचा व्हिडिओ व्हायरल
3

Nikhil Rajeshirke : लक्ष्मी निवास’ फेम निखिल राजेशिर्केच्या मुलाचं बारसं; नावाचा खास अर्थही केला शेअर, बारशाचा व्हिडिओ व्हायरल

Amey Wagh: फ्रेम’मधील भूमिकेने अमेय वाघला दिलं मोठं आव्हान; अभिनेत्याने सांगितला खास अनुभव
4

Amey Wagh: फ्रेम’मधील भूमिकेने अमेय वाघला दिलं मोठं आव्हान; अभिनेत्याने सांगितला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.