Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paresh Rawal : “अमिताभ बच्चन यांनी आता…” अभिनेत्यांबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

Paresh Rawal : सिनेसृष्टीमधून अनेक कलाकार एकामेकांवर टीका, कौतुक करत असतात. असचं एक अभिनेते परेश रावल यांनी ज्येष्ठ अभिनेते परेश रावल याबाबत एक टिप्पणी केली आहे. यावेळी त्यांच्या बोलण्याचा मात्र वेगळा अर्थ काढला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 18, 2026 | 01:03 PM
Paresh Rawal on Amitabh Bachchan (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Paresh Rawal on Amitabh Bachchan (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Paresh Rawal on Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मते मांडली. सध्या चित्रपटसृष्टीतील वातावरण, बदलतं सामाजिक चित्र आणि कलाकारांवर येणारा दबाब याबाबत बोलताना त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयीही मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशलमीडियावर चांगलीच रंगली आहे. मुलाखतीदरम्यान परेल रावल यांनी सांगितले की, आजच्या काळात अनेक लोक आपले विचार उघडपणे मांडताना दहावेळा विचार करतात. एखादे वक्तव्य केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, याची भीती अनेकांच्या मनात असते. पुर्वी अनेक कलाकार आणि सार्वजनिक व्यक्ती निर्भीडपणे बोलत असत, मात्र आता परिस्थिती बदलल्याचे त्यांचे मत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या स्वभावाचाही उल्लेख 

याच विषयावर बोलताना त्यांनी अमिताभ बच्चन त्यांच्या स्वभावाचाही उल्लेख केला. त्यांच्यामते, अमिताभ बच्चन हे वाद टाळणारे व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही वादात अडकण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती हाताळणे त्यांना अधिक योग्य वाटते. त्यामुळे अनेकदा ते कोणत्याही संवेदनशील विषयावर भाष्य करण्याऐवजी मौन बाळगतात. परेश रावल यांनी असेही म्हटले की, आयुष्यातील काही अनुभव माणसाला खूप काही शिकवून जातात. अनेक चढ- उतार पार करत अमिताभ बच्चन या कारकिर्दीपर्यंत पोहचले आहेत. काही कठीण प्रसंगांचा त्यांनी जवळून सामना केला असून त्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे अधिक संयमाने पाहण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे कोणत्याही वादात उडी घेण्याऐवजी ते शांततेचा पर्याय निवडतात.

सततचा गोंधळ यापासून ते स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न

त्यांच्यामते, काही लोक अमिताब बच्चन यांच्या शांत स्वभावाचा चुकीचा अर्थ लावतात. कमी बोलणे, प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया न देणे म्हणजे व्यक्ती कमकुवतपणाचे आहे असे नाही, अनेकदा शांत राहणे ही देखील एक परिपक्व भूमिका असू शकते. प्रत्येक गोष्टीवर सार्वजनिक प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते, असे त्यांनी सूचित केले. परेश रावल यांनी पुढे सांगितले की, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण आवडते. अनावश्यक वाद, आरोप-प्रत्यारोप किंवा सततचा गोंधळ यापासून ते स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अनेकदा कोणत्याही वादग्रस्त चर्चेत सहभागी होत नाहीत.

Marathi Movie: ‘एक होतं माळीण’ पावसात संपूर्ण गाव इतिहासजमा, Trailer पाहून अंगावर येईल काटा

चित्रपटसृष्टीत अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय, शिस्त आणि व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे ते आजही नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान मानले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे आणि भूमिकेकडे लोकांचे विशेष लक्ष असते.

अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू समोर

दरम्यान, परेश रावल यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे, तर काहींनी याबाबत वेगवेगळे दृष्टिकोन मांडले आहेत. मात्र, या चर्चेमुळे अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू समोर आल्याची भावना अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Priyanka Chopra Birthday: 18 व्या वर्षी झाली स्टार, बॉलीवूड ते हॉलीवूड सर्वांच्या मनावर करतेय प्रियांका चोप्रा राज्य 

अमिताभ बच्चन यांनी स्वतः या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे परेश रावल यांनी मांडलेले विचार हे त्यांच्या वैयक्तिक निरीक्षणांवर आधारित असल्याचे मानले जात आहे. तरीही या मुलाखतीनंतर दोन्ही दिग्गज कलाकारांची नावे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत.

Web Title: Paresh rawals big statement on amitabh bachchan choose silence about government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • big breaking
  • bollywod news

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan Birthday: ५ दशकं, असंख्य हिट चित्रपट अन् आजही तोच दरारा! बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ८४वा वाढदिवस
1

Amitabh Bachchan Birthday: ५ दशकं, असंख्य हिट चित्रपट अन् आजही तोच दरारा! बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ८४वा वाढदिवस

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी
2

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.