Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टीव्ही इंडस्ट्रीत सगळेच ड्रग्स घेतात’; टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, स्वतः कोकेन घेतल्याचीही कबुली

टीव्ही अभिनेत्री नारायणी शास्त्रीने टीव्ही इंडस्ट्रीतील ड्रग्ज संस्कृतीबाबत धक्कादायक दावा केला आहे. स्वतः कोकेन आणि एमडीएमएचा प्रयोग केल्याची कबुली देतानाच ड्रग्जमुळे शूटिंगही रद्द व्हायचं, असा दावा तिने केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 24, 2026 | 01:01 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Narayani Shastri: टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने टीव्ही इंडस्ट्रीबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’, ‘कुसुम’ आणि ‘कोई अपना सा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेल्या नारायणीने इंडस्ट्रीतील ड्रग्ज संस्कृतीवर भाष्य करत स्वतःही आयुष्यात एकदा कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा प्रयोग केल्याची कबुली दिली आहे.

सिद्धार्थ कन्ननच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नारायणी म्हणाली की, पूर्वी पार्ट्यांमध्ये दारूसाठी बजेट असायचं, पण आता ड्रग्जसाठी बजेट ठेवलं जातं. त्यामुळेच आपण अनेक वर्षांपूर्वी अशा पार्ट्यांना जाणं बंद केल्याचंही तिने सांगितलं.

“पूर्वी पार्ट्यांमध्ये दारूसाठी बजेट असायचं, पण आता ड्रग्ससाठी बजेट असतं. हे पाहून मला धक्का बसला. आता त्या पार्ट्यांमध्ये नाच-गाणं किंवा मजा नसते, तर काहीतरी वेगळंच सुरू असतं,” असं नारायणीने सांगितलं.

‘कोकेन आणि एमडीएमए वापरलं होतं’

मुलाखतीदरम्यान नारायणीने स्वतः अंमली पदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली. मात्र, हे केवळ प्रयोग म्हणून केल्याचं तिने स्पष्ट केलं.

ती म्हणाली, “मी आयुष्यात अनेक गोष्टी फक्त त्यांचे परिणाम जाणून घेण्यासाठी करून पाहिल्या. कोकेन आणि एमडीएमएसारखे ड्रग्जही एकदाच वापरून पाहिले. मात्र मला कधीच कोणत्याही गोष्टीचं व्यसन लागलं नाही.”

तिने पुढे सांगितलं की, जर कोणी पेयामध्ये काही मिसळलं तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी तिने एकदा दारूचाही प्रयोग केला होता.

Aga Aai Aaho Aai Review: पुण्याची आई, कोल्हापूरची सासू अन् प्रेमळ नात्यांची सुंदर ओढाताण; हृताची सिरीज प्रेक्षकांची मनं जिंकणार?

‘ड्रग्जमुळे शूटिंगही रद्द व्हायचं’

नारायणीने इंडस्ट्रीतील परिस्थितीबाबत आणखी एक धक्कादायक दावा केला. तिच्या म्हणण्यानुसार, काही कलाकार ड्रग्जच्या प्रभावामुळे शूटिंग करण्याच्या स्थितीत नसत आणि त्यामुळे अनेकदा शूटिंग रद्द करावं लागायचं.

“असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा कलाकार शूटिंग करण्याच्या स्थितीत नव्हते. आम्ही चार-चार तास वाट पाहायचो. काही कलाकारांना उभंही राहता येत नव्हतं, तर काही जण त्यांच्या खोलीतून बाहेरही येऊ शकत नव्हते,” असा दावा अभिनेत्रीने केला.

Jana Nayagan Box Office Collection: विजयच्या ‘जन नायकन’ची दणदणीत सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

नव्या वादाला तोंड

‘कोई अपना सा’, ‘कुसुम’, ‘पिया का घर’ आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ यांसारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या नारायणी शास्त्रीच्या या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अंमली पदार्थांच्या वापराबाबत केलेल्या तिच्या दाव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून, तिच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Popular television actress narayani shastri has made a shocking claim about the tv industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • drug
  • Entertainemnt News
  • Television Actress

संबंधित बातम्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
1

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
3

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
4

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.