Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Rawat Death: सिनेसृष्टीवर शोककळा! ‘गजनी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; ७४ व्या वर्षी संपला अभिनयाचा प्रवास

Pradeep Rawat Death: 'गजनी', 'लगान' आणि 'सरफरोश'सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 05, 2026 | 08:20 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया) 'गजनी' फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया) 'गजनी' फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

Follow Us
Follow Us:

Pradeep Rawat Death: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘गजनी’, ‘लगान’ आणि ‘सरफरोश’सारख्या गाजलेल्या चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे . रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदीसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Pradeep Rawat Death)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप रावत गेल्या पाच वर्षांपासून रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होते. उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत काही काळ सुधारणा झाली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी आजार पुन्हा बळावला. गेल्या दोन महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

अभिनेता सोनू सूद यांनी सोशल मीडियावर प्रदीप रावत यांचा फोटो शेअर करत, “प्रदीप रावत भाई, तुमची आठवण नेहमीच येत राहील,” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. टीव्ही अभिनेता आयुषपाल शर्मानेही ‘गजनी’ आणि ‘लगान’मधील त्यांच्या संस्मरणीय भूमिकांची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

South Theatre Release: एक-दोन नाही… तब्बल 11 दाक्षिणात्य चित्रपट एकाच आठवड्यात! बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी?

‘महाभारत’मधील अश्वत्थामापासून सुरू झाला अभिनय प्रवास

प्रदीप रावत यांनी बी.आर. चोप्रा यांची लोकप्रिय मालिका ‘महाभारत’ मध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर ‘तहकीकत’, ‘चंद्रकांता’, ‘युग’ आणि ‘गुल सनोबार’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

चित्रपटांमध्ये त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी भाषांमध्ये काम करत अष्टपैलू अभिनेता म्हणून स्वतःची छाप उमटवली. ‘लगान’, ‘सरफरोश’, ‘गजनी’, ‘आवारापन’, ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘बैजू बावरा’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

‘गजनी’मधील खलनायकाची भूमिका ठरली संस्मरणीय

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘साई’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ ‘गजनी’मधील त्यांच्या खलनायकी भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर हिंदीतील ‘गजनी’ रिमेकमध्येही त्यांनी तीच भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली. याशिवाय ‘पॅरोडी’ (कन्नड), ‘चायना टाऊन’ (मल्याळम), ‘हिरो ४२०’ (बंगाली) आणि ‘क्रॅक फायटर’ (भोजपुरी) यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या.

Entertainment News: छोट्या कथांपासून मोठ्या पडद्यावरील युद्धापर्यंत… एका वेगळ्या विचारांच्या फिल्ममेकरची अनोखी सफर

‘छावा’ ठरला शेवटचा हिंदी चित्रपट

प्रदीप रावत यांचा शेवटचा हिंदी चित्रपट ‘छावा’ होता. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून ते अखेरच्या वेळी मोठ्या पडद्यावर झळकले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक दमदार खलनायक आणि बहुआयामी अभिनेता गमावला आहे.

Web Title: Pradeep rawat death ghajini fame veteran actor passes away at 74

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Actor
  • Bollywood News
  • Death

संबंधित बातम्या

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
1

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
2

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क
3

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
4

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.