Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde on Trollers: त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला.., ‘देऊळ बंद 2’वर टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..

‘देऊळ बंद 2’वर होणाऱ्या टीकेला प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर. “जे देव मानत नाहीत त्यांना हा चित्रपट जास्त झोंबलाय,” असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सवर निशाणा साधला. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 09, 2026 | 09:30 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत नवे विक्रम रचत आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये Top 5 मध्ये स्थान मिळवलं आहे.दुसरीकडे मात्र या चित्रपटावर काही प्रेक्षक आणि टीकाकारांकडून टीका होत आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी अलिकडेच मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत, देऊळ बंद २ चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच झापले आहे.

प्रवीण तरडे यांचे सडेतोड उत्तर
तब्बल 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देऊळ बंद २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मोहन जोशी, स्नेहल तरडे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. महाराष्ट्रभरात या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असला तरी, दुसरीकडे या चित्रपटाला प्रचंड ट्रोल देखील केले जात आहे. नुकतेच प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत, यांना चांगलेच उत्तर दिले आहे. प्रवीण तरडे म्हणाले, ‘ जे देव मानत नाहीत त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला. माझ्या देवाचा उदो उदो मीच करणार. त्यामुळे मी तो केला. त्याचा कोणाला त्रास झाला याबद्दल मला काही देणंघेणं नाही. उलट मी जास्त आनंदी झालो. म्हणजे ‘तीर निशाने पे लगा है.’ शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबण्यासाठी माझा देव मैदानात उतरलाय. शेतकरी बनवून तो बांधा बांधावर फिरला. ग्रामीण भागात थेरडा म्हणण्याची पद्धत आहे.पण देवाने तेही हसत हसत स्वीकारलं. कुठल्याही चमत्काराशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवली . मी माझ्या धर्माचं -देवाचं पालन केलं नाही तर फॉरेनवरून कोणी येणार आहे का? त्यामुळे हे ट्रॉलिंग मी मजेने घेतो’ असं प्रवीण तरडे म्हणाले.

Hotel Pithi Bhaat: अभिनेता समीर खांडेकरचं नवं इनिंग, मुंबईत सुरू केलं ‘पिठी भात’ मालवणी रेस्टॉरंट

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी 1117 शोजमधून 2.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईमुळे चित्रपटाचं एकूण भारतातील ग्रॉस कलेक्शन 66.56 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.सध्या चित्रपटाची गती पाहता, रविवारीही जर अशीच चांगली कमाई झाली, तर ‘देऊळ बंद 2’ सहज 70 कोटींचा टप्पा पार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.भारतातील नेट कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, आतापर्यंत हा आकडा 56.60 कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवताना दिसत आहे.

जावेद जाफरी यांच्या पत्नीला १६.२० कोटींचा गंडा! मुंबई महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

‘देऊळ बंद २’ या चित्रपटातून शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली असून प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई आणि ओम भूतकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Pravin tarde on trolls actor director hits back at critics of deool band 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Box Office
  • marathi cinema
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर
1

Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर

Box Office: ‘Hanuman Ansh’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! यशच्या ‘Toxic’ला दिली टक्कर, कमावला तब्बल 2600% नफा
2

Box Office: ‘Hanuman Ansh’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! यशच्या ‘Toxic’ला दिली टक्कर, कमावला तब्बल 2600% नफा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.