Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Chopra: रसेल क्रोसोबत झळकणार प्रियंका चोप्रा; ‘ब्लूफ्लाय’मधून पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री

Priyanka Chopra: ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनस आता अकादमी पुरस्कार विजेते रसेल क्रोसोबत 'ब्लूफ्लाय' या साय-फाय अॅक्शन थ्रिलरमध्ये झळकणार आहे. या नव्या हॉलिवूड चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 12:29 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रसेल क्रोसोबत ‘ब्लूफ्लाय’मध्ये झळकणार प्रियंका चोप्रा
  • ‘रिसेट’नंतर आणखी एका हॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा
  • 2027 मध्ये एस. एस. राजामौलींच्या ‘वाराणसी’मध्येही दिसणार प्रियंका
Priyanka Chopra: ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनस हिने आणखी एका मोठ्या हॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा केली आहे. अकादमी पुरस्कार विजेते अभिनेते रसेल क्रो यांच्यासोबत ती ‘ब्लूफ्लाय’ (Bluefly) या साय-फाय अॅक्शन थ्रिलरमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निम्रॉड अँटल करणार असून पटकथा डेव्हिड फ्रिजेरिओ, विल्यम यूबँक आणि कार्लाइल यूबँक यांनी लिहिली आहे.

आणखी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये प्रियंका

‘ब्लूफ्लाय’ची घोषणा प्रियंका चोप्राच्या आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘रिसेट’ (Reset) नंतर करण्यात आली आहे. या सर्व्हायव्हल थ्रिलरमध्ये ती ऑर्लॅंडो ब्लूमसोबत दिसणार आहे. याआधी तिचा ‘द ब्लफ’ (The Bluff) हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला होता आणि त्याने जागतिक स्तरावर अव्वल स्थान पटकावले. तसेच इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्यासोबत ती ‘Heads of State’ मध्येही झळकली होती.

एस. एस. राजामौलींच्या चित्रपटातही प्रमुख भूमिका

प्रियंका चोप्रा लवकरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुचर्चित अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट ‘वाराणसी’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘ब्लूफ्लाय’ची कथा काय आहे?

काँगोच्या दाट जंगलात घडणाऱ्या या कथेत, संयुक्त राष्ट्रसंघाचा दुःखाने ग्रासलेला एक अनुवादक एका गुप्त ब्लॅक-ऑप्स मोहिमेचा भाग बनतो. अस्तित्वात नसावे असे मानले जाणारे एक कोसळलेले विमान शोधण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. मात्र, मोहिम पुढे सरकत असताना हे स्पष्ट होत जाते की, त्या विमानाला परत आणण्यासाठी नव्हे तर एका भयावह सत्याला सामोरे जाण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले आहे. विज्ञानकथा आणि थरार यांचा संगम असलेला ‘ब्लूफ्लाय’ हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे.

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

ऑस्ट्रेलियात होणार चित्रपटाचे चित्रीकरण

या चित्रपटाची निर्मिती Polite Society, Broken Open Pictures, G2 Dispatch आणि Highland Film Group यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. Highland Film Group जगभरातील वितरणाची जबाबदारी सांभाळणार असून, चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण यावर्षीच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू होणार आहे.

प्रियंका चोप्रा जोनस भारतीय चित्रपटसृष्टीबरोबरच हॉलिवूडमध्येही सातत्याने दमदार भूमिका साकारत आहे. त्यामुळे ‘ब्लूफ्लाय’मध्ये तिची आणि रसेल क्रो यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

The Paradise Teaser: 20 कोटी व्ह्यूजनंतर ‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज; नानीचा दमदार अंदाज पुन्हा चर्चेत

Web Title: Priyanka chopra to star with russell crowe in bluefly hollywood comeback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Hollywood
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
3

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका
4

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.