Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर

Nitesh Tiwari Ramayana Movie : नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटातील दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांची पहिली झलक समोर आली आहे. निर्मात्यांनी राणी कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता आणि मंथरेच्या भूमिकेतील शीबा चढ्ढा यांचे आकर्षक व्यक्तिरेखा पोस्टर्स सादर केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 09, 2026 | 05:35 PM
Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका ( सौजन्य - सोशल मीडिया )

Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Ramayana बाबत मोठी अपडेट!
  • Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका
  • कैकेयी आणि मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स प्रदर्शित
Nitesh Tiwari Ramayana Movie : नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’च्या निर्मात्यांनी राणी कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता आणि मंथरेच्या भूमिकेतील शीबा चढ्ढा यांची नवी व्यक्तिरेखा पोस्टर्स सादर केली आहेत. या माध्यमातून महाकाव्यातील दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांवर प्रकाश टाकण्यात आला असून, प्रभू श्रीरामांचे भाग्य कायमचे बदलून टाकणाऱ्या घटनांची झलक पाहायला मिळत आहे. ( Nitesh Tiwari Ramayana Movie ) 

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?

‘रामायण’च्या निर्मात्यांनी राणी कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता आणि मंथरेच्या भूमिकेतील शीबा चढ्ढा यांची दोन नवी व्यक्तिरेखा पोस्टर्स सादर केली आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून महाकाव्याच्या कथानकाला निर्णायक वळण देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांची प्रेक्षकांना ओळख करून देण्यात आली आहे.

निर्णायक वळणाची झलक

या पोस्टर्समधून कथेतील एका निर्णायक वळणाची झलक पाहायला मिळते. कैकेयीच्या दोन वरांमुळे राजा दशरथ आणि प्रभू श्रीराम यांच्या आयुष्याची दिशा बदलणार होती, तर मंथरेच्या कानभरणीमुळे राणी कैकेयीच्या निर्णयांवर प्रभाव पडणार होता. याच घटनांमुळे संपूर्ण राज्याचे भविष्य बदलून जाणार होते.

दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांची भर

याआधी निर्मात्यांनी राजा दशरथ यांच्या भूमिकेतील अरुण गोविल यांचे पोस्टर प्रदर्शित केले होते. त्यानंतर या नव्या पोस्टर्समुळे दोन भागांमध्ये साकारल्या जाणाऱ्या या महाकाव्यातील कलाकारांच्या संचात आणखी दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांची भर पडली आहे. अनेक पिढ्यांच्या मनात दूरचित्रवाणीवरील प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमुळे अढळ स्थान निर्माण करणारे अरुण गोविल आता ‘रामायण’च्या जगात अयोध्येचे राजा म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

भूमिकेतील व्यक्तिरेखा राजेशाही थाटात

लारा दत्ता यांची कैकेयीच्या भूमिकेतील व्यक्तिरेखा राजेशाही थाटात सादर करण्यात आली आहे. त्यांचा पारंपरिक पोशाख आणि अलंकार अयोध्येच्या राणीचे वैभव अधोरेखित करतात. दुसरीकडे, शीबा चढ्ढा यांची मंथरेच्या भूमिकेतील व्यक्तिरेखा वेगळ्या रूपात पाहायला मिळते. त्यांच्या पोस्टरमध्ये त्या हातात काठी घेतलेल्या दिसत आहेत.

निर्मात्यांनी सोशल मीडियावर ही पोस्टर्स शेअर करताना पुढील मजकूर लिहिला आहे : “एक राणी. एक आई. दोन वर, जे पित्याच्या प्रेमाला आव्हान देत श्रीरामांचे भाग्य कायमचे बदलून टाकणार होते. एक कपटी बुद्धी. जिच्या कानभरणीमुळे आईच्या प्रेमाचे रूपांतर संपूर्ण राज्याच्या सर्वांत अंधकारमय क्षणात होणार होते. राणी कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता. मंथरेच्या भूमिकेत शीबा चढ्ढा.”

कैकेयी आणि मंथरा व्यक्तिरेखांची पहिली झलक

या व्यक्तिरेखा पोस्टर्समुळे कैकेयी आणि मंथरा या दोन्ही व्यक्तिरेखांची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. पोस्टर्ससोबतच्या मजकुरातून श्रीरामांच्या जीवनप्रवासाला आकार देणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांमध्ये या दोघींची भूमिका किती निर्णायक ठरणार आहे, याचे संकेत मिळतात. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या, साई पल्लवी सीतेच्या, रॉकिंग स्टार यश रावणाच्या, सनी देओल हनुमानाच्या, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दोन भागांमध्ये भव्य महाकाव्य

नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आठ वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. ‘रामायण’ची दोन भागांमध्ये भव्य महाकाव्य म्हणून निर्मिती करण्यात येत आहे.

या चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा चित्रपट भारतभर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण’ IMAX स्वरूपातही प्रदर्शित होणार असून, भारत वगळता जगभरातील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्सकडे असेल, तर हिंदी भाषिक बाजारपेठेतील वितरणाची जबाबदारी धर्मा प्रॉडक्शन्स सांभाळणार आहे.

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

Web Title: Ramayana lara dutta as kaikeyi sheeba chaddha as manthara posters marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Hindi Movie
  • Ramayana
  • Ranbeer Kapoor

संबंधित बातम्या

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
1

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
2

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार
3

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद
4

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.