Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Rani Mukerji: राणी मुखर्जीने आजपर्यंत भारतीय चित्रपटांमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ काम केले आहे. अनेक पुरस्कारही तिला मिळाले आहेत. आता तिचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2026 | 09:46 AM
राणी मुखर्जीचा अभिनयातील कारकिर्दीबाबत विशेष सन्मान

राणी मुखर्जीचा अभिनयातील कारकिर्दीबाबत विशेष सन्मान

Follow Us
Follow Us:
  • तीन दशकांहून अधिक काळ पडद्यावर राज्य करणाऱ्या राणी मुखर्जीचा सन्मान 
  • इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये अभिनयाबाबत विशेष सन्मान 
  • प्रेक्षकांशी भावनिक नात्यातून विशेष गौरव 
Rani Mukerji: राणी मुखर्जीला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक असलेल्या राणी मुखर्जीने विविध प्रकारच्या चित्रपटांमधून तसेच हिंदी सिनेमातील अनेक संस्मरणीय महिला व्यक्तिरेखांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रूढींना आव्हान देणाऱ्या महिलांपासून ते प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखांपर्यंत, राणी यांच्या अभिनयात भावनिक खोली, आत्मविश्वास आणि प्रेक्षकांशी सहज जोडले जाण्याची क्षमता सातत्याने दिसून आली आहे.

‘येथे कोणताही जाती, धर्मावरून भेदभाव नाही…’, A. R. Rahmanच्या वक्तव्यावर राणी मुखर्जी स्पष्टच बोलली

राणी मुखर्जीची उल्लेखनीय कामगिरी 

ब्लॅक, हम तुम , युवा , बंटी और बबली , नो वन किल्ड जेसिका , हिचकी , मर्दानी फ्रँचायझी आणि मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे यांसारख्या चित्रपटांमधून त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय वैविध्य आणि उत्क्रांती दिसून येते. त्याचबरोबर, मानवी भावनांशी जोडलेल्या कथा प्रभावीपणे मांडण्याची त्यांची खासियत कायम राहिली आहे.

IFFM मधील हा सन्मान राणी यांच्या केवळ प्रदीर्घ कारकिर्दीचाच नव्हे, तर त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या जागतिक प्रवासाचाही गौरव करतो. गेल्या तीन दशकांत त्यांच्या चित्रपटांनी भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडत जगभरातील प्रेक्षकांपर्यंत प्रवास केला आहे आणि भारताशी निगडित कथांमध्ये जगभरातील प्रेक्षकांना स्वतःच्या भावनांचे प्रतिबिंब दिसले आहे.

राणी मुखर्जी झाली व्यक्ती 

या सन्मानाबद्दल राणी मुखर्जी व्यक्त झाली आणि म्हणाली की, “जेव्हा मी एक तरुण मुलगी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा एक दिवस माझे चित्रपट आणि मला साकारण्याची संधी मिळालेल्या व्यक्तिरेखा मला समुद्रापार घेऊन जातील आणि ऑस्ट्रेलियासारख्या सुंदर देशातील लोक मला इतक्या प्रेमाने स्वीकारतील, याची मी कधीच कल्पना केली नव्हती. जगभरातील लोकांचे माझ्या सिनेमातून मनोरंजन करणे ही या व्यवसायाने मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. ऑस्ट्रेलियाने नेहमीच मला आणि भारतीय सिनेमाला खुले मनाने स्वीकारले आहे. कथा सांगण्याच्या माध्यमातून विविध संस्कृती एकत्र येतात असे हे ठिकाण बनले आहे. चित्रपट आपल्याला आठवण करून देतात की भावनांना पासपोर्टची गरज नसते आणि प्रेम, हास्य व आशा ही आपल्या सर्वांना समजणारी भाषा आहे.”

ती पुढे म्हणाली की,”अभिनेता म्हणून आम्ही कॅमेऱ्यासमोर अभिनय करतो. पण तो अभिनय जेव्हा एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचतो, तेव्हाच खरी कथा सुरू होते. गेल्या तीन दशकांपासून माझे चित्रपट, माझ्या व्यक्तिरेखा आणि माझा आवाज घरापासून इतक्या दूरपर्यंत पोहोचला आणि तरीही लोकांच्या आयुष्यात त्यांना स्थान मिळाले, हे जाणून घेणे माझ्यासाठी अत्यंत नम्र करणारे आहे. मला अशा महिलांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले ज्या मनमोकळेपणाने हसल्या, मनापासून प्रेम केले, निर्भयपणे लढल्या आणि स्वतःवरचा विश्वास कधीच गमावला नाही. एका अर्थाने प्रत्येक व्यक्तिरेखेने मला थोडेफार बदलले आहे. त्यांनी मला एक चांगली अभिनेत्री बनवले आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे एक चांगली माणूस बनवले.”

Mardaani 3 Trailer: ९३ मुली, ३ महिने…, राणी मुखर्जी ‘मर्दानी ३’ मधून करणार बाल तस्करीचा खुलासा

१३ ते २३ ऑगस्ट रोजी आयोजन 

IFFM सोबतचा राणी यांचा हा सन्मान भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रभावाचा आणि सांस्कृतिक पोहोचचा उत्सव साजरा करणाऱ्या महोत्सवाच्या भूमिकेलाही अधोरेखित करतो. IFFM 2026 चे आयोजन 13 ते 23 ऑगस्टदरम्यान होत असून, देशभरातील भारतीय चित्रपट आणि चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणत भारतीय कथाकथनातील वैविध्य आणि त्याचा जागतिक प्रभाव साजरा केला जात आहे.

राणी मुखर्जीच्या तीन दशकांच्या शानदार कारकिर्दीतील हा सन्मान विशेष महत्त्वाचा आहे. या काळात त्यांनी सातत्याने स्वतःला नव्याने साकारत भारतीय सिनेमातील काही सर्वाधिक प्रभावशाली आणि दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या महिला व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तीन दशकांनंतरही त्यांचा अभिनय विविध पिढ्या आणि भौगोलिक सीमा ओलांडत प्रेक्षकांशी जोडला जात आहे, एक महान अभिनेत्री आणि ती निवडत असलेल्या प्रभावी कथांच्या कालातीत शक्तीची हीच खरी पावती आहे.

Web Title: Rani mukerji honoured at the indian film festival of melbourne special recognition for excellence in acting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • Rani Mukerji

संबंधित बातम्या

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
1

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट
2

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी
3

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास
4

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.