
फोटो सौजन्य - Social Media
अशामध्ये मराठी सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एक दिवसाचा उपोषणही केला होता. तर अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडिया पोस्ट करत सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आहे. पोस्टमध्ये ऋतुजाने हातामध्ये एक लिहलेली note पकडली आहे. तोंडावर पट्टी बांधून त्यावर लिहले आहे की ‘लोकशाहीचा मृत्यू (Death Of Democracy)! ‘ तर हातात धरलेल्या note वर लिहले आहे की ‘धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही एक अक्षम शिक्षण मंत्री आहात. मी सोनम वांगचुक सरांसोबत आहे.’
या पोस्टखाली कॅप्शन देत ऋतुजाने नमूद केले आहे की ‘आम्हाला सरकारकडून उत्तरदायित्व हवं आहे‘. ऋतुजा बागवेच्या या पोस्टमध्ये नेहमी चर्चेत असणारी ऋतुजा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच आम्हीदेखील सोनम सरांच्या सोबत आहोत असे म्हंटले आहे.
ऋतुजा बागवे आणि बरंच काही…
ऋतुजा बागवे या मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून, विविधांगी अभिनयासाठी त्यांचे कौतुक झाले आहे. अभिनयासोबतच त्या सोशल मीडियावरही सक्रिय असून, त्यांच्या फॅशन आणि फिटनेसविषयक पोस्ट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असतात. त्या अंधेरी येथे स्थित असलेल्या ‘फूडचं पाऊल‘ या हॉटेलच्या मालकीण आहेत. सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्या विशेष चर्चेत आल्या आहेत.