Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: ‘ज्या विद्यार्थ्यांना दुखापत झालीये…’, विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

Salman Khan On Student Protest : विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या जखमी होण्याबद्दल चिंता व्यक्त केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 23, 2026 | 08:40 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan On Student Protest : दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन गेल्या महिन्याभरापासून सुरूच आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून 20 जुलैला या आंदोलनला हिंसक वळण लागलं. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज करण्यात आला तसेत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या, लाठीचार्जदरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाले आहे.

या विद्यार्थी आंदोलनाला आता मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकरांनी पाठिंबा दिला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने याच संदर्भात एक पोस्ट शएर केली आहे. सलमानने विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत या प्रकरणावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टसह त्याने स्वत:च्या बालपणीचा शालेय जीवनातील एक फोटो शेअर केला आहे.

सलमान खानने लिहिले, “हे एक अत्यंत शांततापूर्ण आंदोलन होते; त्याला हिंसक वळण लागले हे खूप दुःखद आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. पेपरफुटी हा एक खूप गंभीर मुद्दा आहे. मला आनंद आहे की आपल्या देशातील मुले एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.”

“मी त्यांच्या कृतीचे मनापासून कौतुक करतो. त्यांनी समर्पण, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमातून आपले भविष्य आणि एक उत्तम, सुशिक्षित भारत घडवण्याची आपली तळमळ दाखवून दिली आहे. हे आंदोलन किंवा निषेध योग्य मार्ग आहे आणि विद्यार्थ्यांनी ते शांततेने केले आहे. ते खूप धाडसी आणि शूर आहेत. शिक्षणाबद्दल प्रेरित आणि उत्कट असलेली ही पिढी भारताला गौरव मिळवून देईल.”

Ayesha Khan : रस्त्यावर राहिली उभी, पोलिसांनी घेतलं ताब्यात! धुरंधर 2 फेम अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेत्याने पुढे लिहिले, “हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण प्रणाली यांच्यातील आहे; त्याचे राजकारण केले जाऊ नये. याचे श्रेय पूर्णपणे आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच जाते. मला खात्री आहे की सरकारही पूर्ण पाठिंबा देईल आणि शिक्षण प्रणाली अधिक मजबूत करेल. ही सर्वांसाठी फायदेशीर परिस्थिती आहे. मी सकारात्मक निर्णयासाठी आशा आणि प्रार्थना करतो. ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे, त्या सर्वांवर देवाचा आशीर्वाद असो.”

सलमान खानने पुढे म्हटले, “शिक्षण हा पुढचा ट्रेंड आणि फॅशन असायला हवा, आणि ते दरवर्षी अधिक लोकप्रिय आणि आकर्षक व्हायला हवे, जेणेकरून इतर देशांतील लोक भारतात शिक्षणासाठी येतील आणि भारत एक शैक्षणिक केंद्र बनेल.”

सलमान खान व्यतिरिक्त, मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींनी सीजेपीच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये झीनत अमान, अनुराग कश्यप, शबाना आझमी, रत्ना पाठक शाह, अभय देओल, ओमी वैद्य आणि इतरांचा समावेश आहे.

Shabana Azmi: CJP आंदोलनात शबाना आझमींची बिघडली तब्येत; अश्रुधुरामुळे अस्थमाचा अटॅक आल्याचा आरोप

Web Title: Salman khan breaks silence on paper leak row dont politicise it says actor in post on student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • NEET exam scam
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
1

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द
2

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
3

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या
4

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.