Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanchita Ugale Death Case : संचिता उगलेची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक; उपचारांचा होत नव्हता परिणाम, दोन दिवसांत नेमकं काय घडलं?

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेचे वयाच्या 22 व्या वर्षी निधन झाले. तिच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून समोर आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. जाणून घ्या नेमके काय घडले.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 17, 2026 | 09:00 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला आहे. १४ जून रोजी पालघरच्या नालासोपारा येथील तिच्या घरी ति मृतावस्थेत आढळली. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संचिता ‘कुमकुम भाग्य’, ‘वागळे की दुनिया’ आणि ‘दिलवाली दुल्हा ले जाएंगे’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली होती. सध्या तिच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे मानले जात आहे, परंतु कुटुंब, मित्र आणि सहकलाकारांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे हे प्रकरण वादात सापडले आहे. दरम्यान, तिचे व्हॉट्सॲप चॅट्सही समोर आले आहेत.

संचिता उगले हिचे वयाच्या २२ व्या वर्षी निधन झाले. ती नैराश्याने ग्रस्त होती आणि एका डॉक्टरकडून तिच्यावर उपचार सुरू होते. कुटुंबीय आणि मित्रांनी संचितावर इंडस्ट्रीतील दबावाचा आरोप केला आहे. अनेकांच्या मते, तिला काम मिळत नव्हते. दरम्यान, तिचे व्हॉट्सॲप चॅट्सही समोर आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संचिताने तिच्या घरातील एका बंद खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी संचिता उगलेच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू अहवाल (ADR) म्हणून केली असून, तपास अधिकारी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासह सर्व बाबींची चौकशी करत आहेत. संचिताच्या मृत्यूच्या कारणाबद्दल कुटुंबीयांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या वडिलांचा आरोप आहे की, मृत्यू होण्यापूर्वी संचिता मानसिक तणावाखाली होती आणि तिचा छळ होत होता. ते म्हणाले, “इंडस्ट्रीमधील लोक तिच्यावर दबाव टाकत होते. ती घरी खूप अस्वस्थ होती. ती वरवर ठीक दिसत होती, पण आतून तिला घुसमटत होते. इंडस्ट्रीतील सदस्यांच्या दबावामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली.”

संचिता उगले आणि तिच्या मानसशास्त्रज्ञ यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्सदेखील समोर आले आहेत. या चॅट्समधून असे दिसून येते की, संचिता तिच्या भविष्याबद्दल चिंतित आणि भयभीत होती. इतकेच नाही, तर शूटिंगदरम्यान तिला तिचे डायलॉग्स लक्षात ठेवण्यात अडचण येत होती.

The Maharashtra Files : ‘द महाराष्ट्र फाईल’वरून वाद तीव्र; ‘छोटा मराठा’ शब्दप्रयोगावर मराठा क्रांती मोर्चाचा आक्षेप

चॅटमधून असे दिसून येते की, संचिता उगलेने आपले डायलॉग विसरण्याबद्दल एका साइकोलॉजिस्ट संवाद साधला होता. संचिता इतकी तणावाखाली होती की, तिला पूर्वीसारखा अभिनय करता येत नाही असे वाटत होते. तिने डॉक्टरांना असेही सांगितले की, अनेक महिने उपचार घेऊनही तिला काहीच बरे वाटत नव्हते. डॉक्टरांनी तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला.

Sameer Khandekar : समीर खांडेकरचा मोठा निर्णय; दादरमध्ये घेतलं स्वतःचं घर, मुलीच्या शिक्षणासाठी बदललं आयुष्य

संचिताची जवळची मैत्रीण, इंद्रक्षी कांजिलाल हिनेही आरोप केला की, संचिताला सेटवर समस्या येत होत्या. तिने संचिताचा सह-अभिनेता, उज्ज्वल शर्मा याच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आणि दावा केला की, त्या दोघांमध्ये पैसे आणि कामाशी संबंधित मुद्द्यांवरून मतभेद होते..

Web Title: Sanchita ugale whatsapp chats leaked treatment wasnt showing results what exactly happened in those two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Death
  • Television Actress

संबंधित बातम्या

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
1

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन
2

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.