Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanya Malhotra: लिली सिंगसोबतच्या गप्पांत सान्या मल्होत्राचा मोठा खुलासा; स्त्रीवादाबद्दल मांडलं वेगळं मत

Sanya Malhotra: हिंदी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि वेगळ्या विषयांवरील चित्रपटांमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सान्या मल्होत्राने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनय प्रवासाबरोबरच स्त्रीवाद, महिलांचे प्रतिनिधित्व आणि समाजातील बदलांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 01, 2026 | 06:03 PM
Sanya Malhotra (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sanya Malhotra (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सान्या मल्होत्राने स्त्रीवाद हा केवळ महिलांसाठी नसून पुरुषांसाठीही महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट 
  • महिलांच्या कथा पडद्यावर वास्तववादी आणि प्रामाणिकपणे सादर करण्यावर तिने भर 
  • ‘दंगल’पासूनच्या दहा वर्षांच्या प्रवासानंतरही आशयघन आणि वेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्राधान्य 
Bollywood News: हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी सान्या मल्होत्रा हे एक महत्त्वाचं नाव आहे. मोठ्या स्टारडमच्या मागे न धावता आशयघन आणि वेगळ्या विषयांवरील चित्रपट निवडण्याची तिची पद्धत कायम चर्चेत राहिली आहे. दंगल पासून सुरु झालेला तिचा प्रवास आज दहा वर्षांचा झाला असला, तरी अभिनयाकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन अजूनही तितकाच स्पष्ट आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने आपल्या कामामागची भूमिका, महिलांविषयीचे विचार आणि समाजातील बदलांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

केवळ मनोरंजनाचा भाग नाही

सान्याच्या मते, अभिनय हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही. एखादी भूमिका समाजात विचार निर्माण करु शकत असेल, तर त्या भूमिकेचं महत्त्व अधिक वाढतं. त्यामुळे ती नेहमी अशाच कथा निवडण्याचा प्रयत्न करते, ज्या महिलांच्या आयुष्याकडे वास्तववादी नजरेने पाहतात. तिच्या मते, पडद्यावर महिला केवळ सहाय्यक पात्र म्हणून नव्हे, तर स्वत:च्या निर्णयांवर उभ्या राहणाऱ्या व्यक्ती म्हणून दिसणं गरजेचं आहे.

तिने सांगितलं की, अभिनेत्री होण्याचं स्वप्र ती लहानपणापासून पाहत होती. आज त्या स्वप्राची पूर्तता होत असल्याचा आनंद तिला होता, प्रत्येक चित्रपटातून काहीती नवीन शिकायला मिळतं आणि प्रेक्षकांपर्यंत अर्थपूर्ण कथा पोहोचण्याची संधी मिळते, हेच तिच्यासाठी सर्वात मोठं यश असल्याचं ती म्हणाली.

मिसेस या चित्रपटाचा उल्लेख करताना सानीया काय म्हणाली?

मिसेस या चित्रपटाचा उल्लेख करताना सान्याने सांगितलं की, या भूमिकेमुळे तिला अनेक माहिलांच्या आयुष्याशी जवळून परिचय झाला. चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिने अनेक माहिलांशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवांमधून तिला समाजातील अनेक वास्तव गोष्टी समजल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक महिलांनी तिच्याशी संपर्क साधून ही कथा त्यांच्या स्वत:च्या आयुष्याशी जुळत असल्याचं सांगितलं. हा प्रतिसाद तिच्यासाठी भावनिक आणि विचार करायला लावणारा होता.

Box Office: भारतात हॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटाचा Box Officeवर धडाका! दोन दिवसांतच ‘धुरंधर’ आणि ‘डंकी’ला टाकलं मागे

सान्याने स्त्रीवादाबद्दलही आपलं मत स्पष्ट केलं. तिच्या मते, काही वर्षांपूर्वी या संकल्पनेचा अर्थ तिला नीट माहिती नव्हता. मात्र मुंबईत आल्यानंतर, विविध अनुभव घेतल्यानंतर आणि अनेक गोष्टी वाचल्यानंतर तिचा दृष्टीकोन बदलला. समाजात महिलांवर अजूनही अनेक मर्यादा लादल्या जातात, हे तिला हळूहळू जाणवलं. फक्त महिलाच नाही, तर पुरुषांनाही ठरावीक चौकटीत राहण्याचा दबाब सहन करावा लागतो. असंही ती म्हणाली.

प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि सन्मान मिळावा

तिच्या मते, स्त्रीवाद म्हणजे महिलांना पुरुषांपेक्षा वरचढ ठरवणं नाही. प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि सन्मान मिळावा, हीच त्यामागची भावना आहे. समाजाने पुरुषांवरही अनेक अपेक्षांचं ओझं टाकलं आहे. भावना व्यक्त करू नयेत, नेहमी कठोर राहावं, अशा अनेक गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात. त्यामुळे समानतेचा विचार हा दोघांसाठीही महत्त्वाचा असल्याचं सान्याचं मत आहे.

तिने आपल्या आईचाही उल्लेख केला. तिच्या आईला फॅशन डिझायनर बनण्याचं स्वप्न होतं, पण परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. अशा अनेक महिलांची स्वप्नं जबाबदाऱ्यांमध्ये हरवून जातात, ही बाब तिला कायम अस्वस्थ करते. त्यामुळे पडद्यावर अशा कथा मांडण्याची जबाबदारी कलाकार म्हणून आपली आहे, असं ती मानते.

चित्रपट समाज एका दिवसात बदलू शकत नाहीत

सान्याच्या मते, चित्रपट समाज एका दिवसात बदलू शकत नाहीत. मात्र एखादा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या विचारांमध्ये थोडासा का होईना बदल झाला, तरी त्याचं समाधान असतं. चर्चेला सुरुवात होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच ती लोकप्रियतेपेक्षा आशयाला अधिक महत्त्व देते.

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा

आज सान्या मल्होत्रा ही केवळ चांगली अभिनेत्री म्हणून नव्हे, तर विचारपूर्वक भूमिका निवडणारी कलाकार म्हणून ओळखली जाते. तिच्या आगामी चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी वेगळं सांगण्याचा तिचा प्रयत्न कायम राहिला असून, याच गोष्टीमुळे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.

 

Web Title: Sanya malhotra opens up on feminism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainemnt News
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.