Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shabana Azmi: जंतर मंतरवर पोहोचल्या शबाना आझमी, अभिजीत दिपके यांना दिला धीर; विद्यार्थ्यांशी साधला भावनिक संवाद

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवरील आंदोलनाला शबाना आझमी यांनी भेट देत अभिजीत दीपके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी सरकारला आंदोलकांचं म्हणणं ऐकण्याचं आवाहन केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 20, 2026 | 11:46 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शबाना आझमी यांनी घेतली अभिजीत दीपके यांची भेट
  • शबाना आझमी यांनी तेथील विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा
  • शबाना आझमींनी पंतप्रधानांना लिहिले पत्र
Shabana Azmi Supports Abhijit Deepke at Jantar Mantar Protest: नीट (NEET ) पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शिक्षणविषयक मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या २०व्या दिवशी सोनम वांगचुक  (Sonam Wangchuk)यांनी जबरदस्ती पोलिसांनी हटवून रूग्णालयात दाखल केल्यानंतर आता अभिजित दीपके जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. यांच्या आंदोलनाला मराठी कलाकरांसह बॉलिवडमधूनही पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  (Shabana Azmi)यांनी सध्या उपोषणावर असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) यांना भेट दिली.

या आंदोलनस्थळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये शबाना आझमी त्यांच्या भेटीदरम्यान अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधताना आणि हस्तांदोलन करताना दिसत आहेत. त्या इतर आंदोलकांनाही भेटल्या. सीजेपीच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २८ जूनपासून अनिश्चित काळासाठी उपोषणावर असलेले सोनम वांगचुक यांना त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिल्यानंतर काही दिवसांनी ही भेट झाली आहे.

Shabana Azmi has arrived at Jantar Mantar in solidarity with the protesters demanding accountability from the govt. @AzmiShabana @abhijeet_dipke pic.twitter.com/OMUwfHyggJ — Cockroach is Back (@Cockroachisback) July 19, 2026


‘जिवंत प्रेतांच्या गर्दीत तोच एकटा..’; सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शेखर सुमन यांचा मोदी सरकारवर निशाणा

शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर वांगचुक यांचा एक फोटो शेअर केला आणि त्यांना न्यायासाठीचा लढा सुरू ठेवताना आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले, “प्रिय सोनम वांगचुक, आपल्या देशाला तुमच्यासारख्या व्यक्तीची नितांत गरज आहे. तुम्ही अन्यायाच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने उभ्या राहता. आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे.”

शबाना यांनी विद्यार्थ्यांना दिला धीर
शबाना आझमी यांनी तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. काही विद्यार्थी उपोषणाच्या ठिकाणी जमिनीवर झोपले होते; अभिनेत्री त्यांच्याकडे गेल्या, त्यांनी त्यांच्या हातांचे चुंबन घेतले आणि त्यांचे सांत्वन केले.

दरम्यान शबाना आझमींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, ”जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हाच मी बोलते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल मी मत व्यक्त करत नाही. मी आणि जावेद साहेबांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. की तुम्ही यावर काहीतरी प्रतिक्रिया द्या. “तुम्ही या आंदोलकांचं म्हणणं तरी ऐकून घ्या. दोन दिवसांत आम्ही उत्तर देऊ, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. पण, इतक्या दिवसांनंतरही काहीच उत्तर मिळालेलं नाही. म्हणून मी आज इथे आली आहे.”

Thank you @AzmiShabana ma’am for your support, solidarity and love.. pic.twitter.com/d67vj2LGYS — Neha (@neha_aisa) July 19, 2026


Sonam Wangchuk : ‘अशी कायरता कधी पाहिलीये का?’ विशाल दादलानी भडकला! व्यक्त केला राग, म्हणाला ‘जागे व्हा!’

अभिजीत दीपके यांचा पोलिसांवर आरोप
दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली असून, वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने हटवण्यात आल्याचा आरोप केला आहे. वृत्तानुसार, त्यांनी या कारवाईला “मोठी चूक” म्हटले असून, सोनम वांगचुक यांचे अपहरण केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे.

शबाना यापूर्वी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठीच्या मोहिमांसह अनेक सार्वजनिक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या आहेत. जंतर मंतर येथील आंदोलन कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आयोजित केले होते, जी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेवर कारवाईची मागणी करत आहे.

Web Title: Shabana azmi visit jantar mantar in new delhi and met abhijit deepak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

CJP Parliament March LIVE:  लाठीचार्जाच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
1

CJP Parliament March LIVE:  लाठीचार्जाच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

CJP Parliament March LIVE: उपोषण सोडण्यास तयार पण…; सोनम वांगचुक यांच्या तीन अटी सरकार मान्य करणार का?
2

CJP Parliament March LIVE: उपोषण सोडण्यास तयार पण…; सोनम वांगचुक यांच्या तीन अटी सरकार मान्य करणार का?

Cockroach Janta Party Sansad March Live: जंतर-मंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज
3

Cockroach Janta Party Sansad March Live: जंतर-मंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज

‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!’ भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ, जनतेची फसवणूक करत असल्याचा दावा
4

‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!’ भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ, जनतेची फसवणूक करत असल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.