Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima Special: ‘वड समजून पिंपळाची पूजा केली’; ‘मोहिनी’ फेम सोनाली पंडितने सांगितला पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा

'मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी' फेम अभिनेत्री सोनाली पंडितने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा सांगितला. वडाऐवजी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याची आठवण तिने शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 29, 2026 | 05:10 PM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आज देशभरात वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करून उपवास करतात. महाराष्ट्रात या सणाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. याच निमित्ताने ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ फेम अभिनेत्री सोनाली पंडित हिने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेचा एक मजेशीर आणि अविस्मरणीय किस्सा शेअर केला.

नवराष्ट्र डिजिटल लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत सोनालीला तिच्या पहिल्या वटपौर्णिमेबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती हसत म्हणाली, “मी यापूर्वी कधीच वटपौर्णिमा केली नव्हती. आम्ही जिथे राहायला आलो होतो, तिथे घराच्या मागे एक मोठं झाड होतं. मी छान तयार होऊन त्या झाडाची पूजा केली. पण मला आश्चर्य वाटलं की अजून कोणीच पूजा करायला आलं नव्हतं. मला वाटलं, कदाचित मीच खूप लवकर आले असेन.”

पुढे ती म्हणाली, “नंतर माझ्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणींनी विचारलं, ‘तू पूजेला का आली नाहीस?’ तेव्हा मी सांगितलं की, मी तर पूजा करून आले. त्यावर त्या म्हणाल्या, ‘अगं, ते पिंपळाचं झाड आहे. वडाचं झाड पुढे आहे.’ हे सांगताना आजही मला खूप लाज वाटते,” असं सोनाली ने सांगितले.

तिने पुढे विनोदी अंदाजात सांगितले की, “त्या घटनेनंतर मी पुन्हा कधी वटपौर्णिमेची पूजा केली नाही.” सोनालीचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Awarapan 2 Teaser: १९ वर्षांनंतर Emraan Hashmiचा जुना अंदाज पुन्हा चर्चेत, ‘आवारापन 2’च्या टीझरने जिंकली चाहत्यांची मनं

१० वर्षांनंतर मराठी मालिकेत पुनरागमन

मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली पंडितने तब्बल १० वर्षांनंतर मराठी मालिकेत पुनरागमन केले आहे. अल्फा मराठीवरील ‘प्रपंच’ मालिकेतून तिने घराघरात ओळख निर्माण केली होती. त्यानंतर ‘मॅडम सर’, ‘यहाँ मैं घर घर खेली’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ आणि ‘गठबंधन’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही तिने दमदार भूमिका साकारल्या.

Kiss Controversy:  किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा? व्हायरल Videoनंतर रंगली चर्चा

वटपौर्णिमा स्पेशल महासंगम

दरम्यान, कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ आणि ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकांचा वटपौर्णिमा विशेष महासंगम २९ जून ते १ जुलैदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विशेष भागात सुपरस्टार आरकेची दमदार एन्ट्री, शालिनीच्या बेपत्ता होण्याचे रहस्य, तसेच कौटुंबिक नाट्य, रोमँस आणि थरार यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे.

Web Title: Sonali pandit first vat purnima funny incident mohini colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • vat pornima

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.