Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Pilgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो भावूक निरोप! सचिन पिळगांवकरांनी सांगितला ‘नवरा माझा नवसाचा’शी संबंधित किस्सा

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीचा भावूक किस्सा सांगितला. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील बाबू कालियाची भूमिका मूळतः लक्ष्मीकांत बेर्डेंसाठी विचारात होती.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 18, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Sachin Pilgaonkar:  मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगांवकर आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. या दोघांनीही आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी संबंधित एक भावूक आठवण सांगितली. ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना महत्त्वाची भूमिका द्यायची होती; मात्र त्यांच्या आजारपणामुळे ही इच्छा अपूर्ण राहिली. हा प्रसंग सांगताना सचिन पिळगांवकर भावूक झाले.

‘लक्ष्या आजही माझ्यात जगतो’; सचिन पिळगांवकर भावूक

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले, “लक्ष्या आजही माझ्यात जगतो, इतका तो माझा चांगला मित्र होता.” त्यांच्या या शब्दांतून दोघांमधील घट्ट मैत्रीची प्रचिती येते. लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात असते, तर त्यांनी आणखी अनेक चित्रपट एकत्र केले असते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असतं, अशी भावनाही सचिन यांनी व्यक्त केली.

‘नवरा माझा नवसाचा’मधील ती भूमिका लक्ष्मीकांत बेर्डेंसाठी होती विचारात

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे रुग्णालयात होते. आजारपणामुळे त्यांचं काम थांबलं होतं. अशा कठीण काळात सचिन पिळगांवकर यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या चित्रपटात काम करण्याची विनंती केली होती.
सचिन यांनी चित्रपटात काम करण्याविषयी सांगितल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली. मात्र, सचिन यांनी त्यांना धीर देत, त्यांच्या प्रतीक्षेत थांबण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला होता.

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एलिमिनेशन! सलमान खान कोणाला दाखवणार घराबाहेरचा रस्ता?
प्रदीप पटवर्धन यांनी साकारलेली भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे करणार होते?

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी साकारलेली बाबू कालियाची भूमिका मूळतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी विचारात घेतली होती, असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं. चित्रपटाच्या कथानकात ही भूमिका महत्त्वाची होती. लक्ष्मीकांत यांनी आपल्या खास विनोदी शैलीत ही व्यक्तिरेखा साकारली असती, तर तिची रंगत आणखी वाढली असती, अशी भावना व्यक्त केली जाते.

मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं आणि त्यांना या चित्रपटात पाहण्याची सचिन पिळगांवकर यांची इच्छा अपूर्ण राहिली. आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी मराठी प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या आणि सचिन पिळगांवकर यांच्या मैत्रीचा हा भावूक किस्सा पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला.

Resham Tipnis Viral Video: वयाच्या 53 व्या वर्षी अभिनेत्री पुन्हा बोहल्यावर चढणार? लग्नपत्रिका वाटतानाचा VIDEO व्हायरल

Web Title: Sachin pilgaonkar remembers laxmikant berde navra maza navsacha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • entertainment
  • Sachin Pilgoankar

संबंधित बातम्या

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर
1

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एलिमिनेशन! सलमान खान कोणाला दाखवणार घराबाहेरचा रस्ता?
2

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एलिमिनेशन! सलमान खान कोणाला दाखवणार घराबाहेरचा रस्ता?

Kon Honaar Crorepati: ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा; माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची रंगणार मैफल
3

Kon Honaar Crorepati: ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा; माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची रंगणार मैफल

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ
4

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.