
फोटो सौजन्य - Social Media
अशामध्ये या प्रकरणावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील राजशेखरनेदेखील या मुद्द्यावर त्याचा राग व्यक्त केला आहे. पोस्ट करत त्याने म्हंटले आहे की, “रेल्वे डब्यात किमान शंभर लोक असतील.. घटनेचे विडीयो निघाले.. पण कुणी मयंकला मदत केली नाही, की खुनी पकडला नाही… हे तितकचं गंभीर आहे…”. फक्त स्वप्नील नव्हे तर जगभरातील बहुतेक जणांनी त्या स्थळी उपस्थित बघ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. अनेकांचे हे म्हणणे आहे की, “एकटे नाही पण किमान चार-पाच जणांनी एकदाच त्या विकृत आरोपीवर हल्ला केला असता तरी तो निष्पाप जीव आज आपल्यात हयात असता.”
स्वप्नीलने त्याचा मुद्दा समजावण्यासाठी खाली एक उदाहरण दिले आहे. तो सांगतो की, “एक हत्यारबंद माथेफिरू एका मुलीवर बेभान चाकू हल्ला करत असताना एका धाडसी युवकाने पुढे होऊन त्याला हातातल्या सॅकने हाणायला सुरुवात केली… ते पाहुन बाकीचे पाचसहा बघे पुढे झाले.. त्यानी त्या हल्लेखोराला हाणलं, पुढचे वार करण्यापासुन अडवलं अन मग त्याला पकडून दिलं… अन बहुदा त्या मुलीचा जीवही वाचला ही हल्लीची घटना प्रसिद्ध आहे… आणि माझा मुद्दा समजून घेणाऱ्याला ईतपत पुरेसं आहे…”
एकंदरीत, या घडलेल्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या बघ्यांवर जगभरातून थू-थू केली जात आहे. त्यातला किमान काही जण तरी त्याक्षणी पुढे सरकले असते तर कदाचित आज मयंक आपल्यात असता, असे अनेकांचे मत आहे.