Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

tanushree dutta: नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने VIDEO शेअर केला. नानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत तिने प्रतिक्रिया देण्याबाबत काय म्हटलं? जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 08, 2026 | 12:50 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नाना पाटेकरांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा
  • नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने शेअर केला VIDEO
  • VIDEOमधील त्या शब्दांनी वेधलं लक्ष
Tanushree Dutta: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांनी आज, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी, राजकीय क्षेत्र आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर नानांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्ताचे नावही चर्चेत आले आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘मी बातमी ऐकली…’

तनुश्री दत्ताने व्हिडीओमध्ये म्हटले की, तिला नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजली आहे. मात्र, आज तिच्यासाठी कामाचा महत्त्वाचा दिवस असून ती एका कार्यक्रमासाठी लखनौला जात आहे. या कार्यक्रमावर तिला लक्ष केंद्रित करायचे असल्याचे तिने सांगितले.

तनुश्री म्हणाली, “मी बातमी ऐकली. आज माझ्या कामाचा दिवस आहे. मी एका कार्यक्रमासाठी लखनौला जात आहे आणि मला त्यावरच लक्ष केंद्रित करायचे आहे. हे सर्व घडण्यासाठी आजचा दिवस किती विचित्र आहे.”

तिने पुढे सांगितले की, लखनौमधील तिचा कार्यक्रम तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. दिवसभर लाईव्ह जाणे आणि कंटेंट पोस्ट करण्याचे तिचे नियोजन होते आणि आता मला काळजी वाटते की संध्याकाळपर्यंत मीडियाला फक्त ‘ईविल डेड’मध्येच रस असेल. त्यामुळे, मी कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजल्यावर मी माझी प्रतिक्रिया देईन.

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल

‘मी कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजल्यावर…’

तनुश्रीने पुढे म्हटले की, या परिस्थितीवर नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजून घेतल्यानंतर ती आपली प्रतिक्रिया देईल. तसेच नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांप्रती तिने संवेदना व्यक्त केल्या.

तिच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद यापूर्वी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता.

Nana Patekar Funeral: चाहत्यांना अश्रू अनावर; नाना पाटेकरांवर कुठे होणार अंत्यसंस्कार? माहिती समोर आली

तनुश्री-नाना वाद काय होता?

२००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. जवळपास दशकभरानंतर २०१८ मध्ये तिने पुन्हा हे आरोप सार्वजनिकपणे मांडले. त्यानंतर भारतातील #MeToo चळवळीच्या काळात हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे वृत्त होते. दुसरीकडे, नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावले होते.

आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा या जुन्या वादाची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Tanushree dutta evil dead nana patekar death reaction ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
1

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
2

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल
3

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
4

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.